• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics : 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीम सेमी फायनलमध्ये, पदकापासून एक पाऊल दूर

Tokyo Olympics : 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीम सेमी फायनलमध्ये, पदकापासून एक पाऊल दूर

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारतासाठी आजचा दिवस उत्कृष्ट राहिला. पहिले पीव्ही सिंधूने (PV Sindhu) ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर भारतीय हॉकी टीमनेही (Indian Hockey Team) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

 • Share this:
  टोकयो, 1 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारतासाठी आजचा दिवस उत्कृष्ट राहिला. पहिले पीव्ही सिंधूने (PV Sindhu) ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर भारतीय हॉकी टीमनेही (Indian Hockey Team) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. ब्रिटनविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा (India vs Britain) 3-1 ने विजय झाला. 8 वेळची ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट असलेल्या भारतीय पुरुष हॉकी टीमने सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला आहे. 41 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय टीम ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. या मुकाबल्यामध्ये भारताकडून दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला, तर ब्रिटनकडून एकमात्र गोल वॉर्डने केला. ऑलिम्पिकमध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यात 9 व्यांदा हॉकीचा सामना झाला, या विजयानंतर भारताने आपलं विजय-पराभवाचं रेकॉर्ड 5-4 केलं आहे. क्वार्टर फायनलच्या या सामन्यातमध्ये भारताने दमदार कामगिरी केली. पहिल्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने गोल करून भारताला पहिली आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये गुरजंतने भारताला आणखी एक गोल करून दिला. हाफ टाईमपर्यंत भारताचा स्कोअर 2-0 झाला. तिसरा क्वार्टर संपण्याच्या एक मिनीट आधी ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यांना गोल करण्यात यश आलं नाही. यानंतर लगेचच मिळालेल्या दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरमध्ये मात्र त्यांनी अजिबात चूक केली नाही. चौथा क्वार्टर संपण्याच्या जवळपास 6 मिनीटं आधी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार मनप्रीत सिंगला यलो कार्ड दाखवण्यात आलं. तेव्हाच मिडफिल्डर असलेल्या हार्दिक सिंगने चपळता दाखवत शानदार गोल करत भारताला 3-1 ची विजयी आघाडी मिळवून दिली. 3 ऑगस्टला भारत आणि बेल्जियम यांच्यात सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. बेल्जियमने क्वार्टर फायनलमध्ये स्पेनचा 3-1 ने पराभव केला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये सामना रंगेल. ऑस्ट्रेलियाकडून 1-7 ने पराभव झाल्याशिवाय भारताने टोकयो ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार कामगिरी केली. लीग फेसमध्ये भारताने 5 पैकी 4 मॅच जिंकल्या, त्यामुळे भारतीय टीम लीग स्टेजला दुसऱ्या क्रमांकावर राहत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताने लागोपाठ 3 मॅच जिंकल्या आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताला अखेरचं पदक 1980 साली मॉस्कोमध्ये जिंकलं होतं. वासुदेवन भास्करनच्या नेतृत्वात भारताला मेडल मिळालं. यानंतर भारतीय हॉकी टीमची कामगिरी ढासळली. 1984 लॉस एन्जिलिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीम पाचव्या क्रमांकावर राहिली. 2008 साली ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारतीय टीम क्वालिफाय झाली नाही, तर 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये भारत अखेरच्या क्रमांकावर राहिला. मागच्या 5 वर्षांमध्ये भारतीय हॉकी टीमची कामगिरी सुधारली आहे, त्यामुळे भारतीय टीम तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली. दोन वर्षांपूर्वी कोच झालेले ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रीड यांच्यामुळेही भारताची कामगिरी सुधारली.
  Published by:Shreyas
  First published: