मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympic : टोकयोत इतिहास घडवून भारतात परतले खेळाडू, दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत

Tokyo Olympic : टोकयोत इतिहास घडवून भारतात परतले खेळाडू, दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत

इतिहास घडवून भारतीय खेळाडू मायदेशात परतले

इतिहास घडवून भारतीय खेळाडू मायदेशात परतले

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर या खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर या खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. क्रीडा रसिकांसह खेळाडूंचे नातेवाईकही विमानतळावर आले. बॅण्ड बाजासह टोकयोतून आलेल्या भारतीय खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं.

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भालाफेक स्पर्धेत (Men's javelin throw) गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला. ऍथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. कडेकोट सुरक्षेसह नीरज चोप्रा विमानतळाहून बाहेर आला.

नीरज चोप्राचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर भाजप खासदार तेजस्वी सूर्या देखील पोहोचले होते.

कुस्तीपटू रवी दहियाने (Ravi Dahiya) टोकयो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं. दिल्ली विमानतळावर रवीचं स्वागत करण्यासाठी त्याचे नातेवाईक आणि चाहतेही दाखल झाले होते. ढोल, बॅण्ड आणि बाजा यांच्यासह रवीचं स्वागत करण्यात आलं.

कुस्तीपटू बजरंग पुनियादेखील (Bajrang Punia) टोकयोवरून भारतात परतला. बजरंग पुनियाचं स्वागत करण्यासाठीही त्याचे मित्र, कुटुंब आणि चाहते दिल्ली विमानतळावर आले होते. अशाप्रकारचं प्रेम आणि आदर मिळत असल्यामुळे आनंद होत असल्याची प्रतिक्रिया बजरंग पुनियाने दिली.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण 7 मेडल मिळाली. एका ऑलिम्पिकमध्ये एवढी मेडल मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. भालाफेकीमध्ये नीरज चोप्राला गोल्ड मेडल, वेटलिफ्टर मीराबाई चालू (Mirabai Chanu) आणि पैलवान रवी दहियाला सिल्व्हर आणि पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Punia), बॉक्सर लवलीना बोरगोहन (Lovlina Borgohain) आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं. याशिवाय भारताच्या पुरुष हॉकी टीमला 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावता आलं. भारताच्या हॉकी टीमने या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं.

First published:

Tags: Olympics 2021