नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian women hockey team) यंदा केलेली कामगिरी ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी मानली जात आहे. पदकानं हुलकावणी दिली असली, तरी भारतीय महिला हॉकी टीमला असणारा आत्मविश्वास आणि जोश देणारे कोच शोर्ड मारिन (Shored Marin) यांनी टीमला अलविदा (good bye) करत असल्याची घोषणा केली आहे.
मूळचे नेदरलंडचे खेळाडू असणारे शोर्ड मारिन यांच्या कोचिंगमुळे भारतीय महिला टीमची कामगिरी उंचावल्याचं सर्वांनाच दिसलं. ऑलिम्पिक स्पर्धा ही भारतीय महिला हॉकी टीमसोबतची आपली शेवटची स्पर्धा होती, असं सांगत शोर्ड मारिन यांनी टीमचा निरोप घेत असल्याची घोषणा केली आहे. शोर्ड यांचा करारही संपत असून केंद्र सरकारनं कराराला मुदतवाढ देण्याचा दिलेला प्रस्ताव त्यांनी नाकारला आहे.
काय म्हणाले शोर्ड मारिन
शोर्ड मारिन यांची 2017 मध्ये भारतीय हॉकी टीमच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुरुष टीमची जबाबदारी काही काळासासाठी देण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच पुन्हा महिला टीमचे ते कोच झाले. विशेष म्हणजे गेल्या 16 महिन्यांपासून ते आपल्या घरी गेलेले नाहीत. कोरोना काळात आलेली आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंधनं आणि भारतीय महिला हॉकी टीमचा सराव या दोन्ही कारणांमुळे ते भारतातच थांबले आहेत. त्यांच्या निर्णयामागे हे कारणही असू शकतं, असं सांगितलं जात आहे.
भारतीय महिला हॉकी टीमच्या अखेरच्या सामन्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच बोलकी आहेत. पराभवानंतर सर्वांनाच दुःख होतं. ते कमी करण्यासाठी माझ्याकडे सांत्वनाचे शब्द नाहीत. मात्र भारतीय महिला टीमनं पदक मिळवलं नसलं, तरी त्यापेक्षा खूप काही अधिक मिळवलं आहे. भारतातील कोट्यवधी नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये हॉकी या खेळाला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळाली आहे, असं ते म्हणाले.
हे वाचा -मेडल गमावल्यानंतर हॉकी टीमच्या कॅप्टननं देशवासियांना केलं 'हे' आवाहन
जानेका शोपमॅन यांच्याकडे जबाबदारी
शोर्ड मारिन यांच्यासोबत विश्लेषणात्मक कोच म्हणून काम करणारे जानेका शोपमेन यांच्याकडे आता मुख्य कोचपदाची जबाबदारी येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शोपमेन यांचाही करार मारिन यांच्यासोबत संपत आहे. मात्र त्याला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर ते विचार करतील, अशी आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.