मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : गोल्डन बॉय नीरजवर पैशांचा पाऊस, 3 तासात मिळाले 13 कोटी रुपये

Tokyo Olympics : गोल्डन बॉय नीरजवर पैशांचा पाऊस, 3 तासात मिळाले 13 कोटी रुपये

नीरज चोप्राला दोन दिवसांपासून ताप

नीरज चोप्राला दोन दिवसांपासून ताप

टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मेडल मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये करोडपती झाला आहे. गोल्ड मेडल मिळाल्यानंतर नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मेडल मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये करोडपती झाला आहे. गोल्ड मेडल मिळाल्यानंतर नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. तीन तासांमध्येच नीरजला वेगवेगळ्या संस्थांनी एकूण 13 कोटी 75 लाख रुपये दिले आहेत. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) ऐतिहासिक कामगिरी करत भारताला स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. ऑलिम्पिक इतिहासात भारताला हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल मिळालं आहे.

भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

हरियाणा सरकारकडून मदत

'नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल. तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,' अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केली आहे.

BCCI देणार 1 कोटी रुपये

बीसीसीआय (BCCI) नीरज चोप्राला 1 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. याशिवाय सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्यांना प्रत्येकी 50-50 लाख रुपये आणि ब्रॉन्झ मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 25-25 लाख रुपये मिळतील. भारताच्या पुरुष हॉकी टीमने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं, त्यांना बीसीसीआय 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांनी नीरज चोप्राला 2 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे, याशिवाय नीरजला मणीपूर सरकार (Manipur Government) 1 कोटी रुपये, रेल्वेकडून 3 कोटी रुपये मिळणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOC) नीरजला 75 लाख रुपये देणार आहे. आयपीएलमधली चेन्नई सुपरकिंग्स टीमने (CSK) नीरजला 1 कोटी रुपये जाहीर केले आहेत. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नीरज चोप्राला त्यांची आगामी XUV 700 भेट द्यायचं ठरवलं आहे.

नीरजला मिळणार एवढी मदत

हरियाणा सरकार- 6 कोटी रुपये

पंजाब सरकार- 2 कोटी रुपये

मणीपूर सरकार- 1 कोटी रुपये

रेल्वे- 3 कोटी रुपये

भारतीय ऑलिम्पिक संघटना- 75 लाख रुपये

चेन्नई सुपरकिंग्स- 1 कोटी रुपये

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा- XUV 700

First published:

Tags: Olympics 2021