• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Lovlina Borgohain चं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, Tokyo Olympic मध्ये कांस्यपदकावरच मानावं लागणार समाधान

Lovlina Borgohain चं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, Tokyo Olympic मध्ये कांस्यपदकावरच मानावं लागणार समाधान

भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बुसेनाझ सुरमेनेली (Busenaj Surmenelli) यांच्यातील उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) सामन्यात लवलीनाचा पराभव झाला आहे

 • Share this:
  टोकयो, 04 ऑगस्ट: भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बुसेनाझ सुरमेनेली (Busenaj Surmenelli) यांच्यातील उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) सामन्यात लवलीनाचा पराभव झाला आहे. त्यामुळे लवलीनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागणार आहे. तुर्कीच्या गतविजेत्या बुसेनाझ सुरमेनेलीविरुद्ध लवलीनाला पराभव पत्करावा लागला. आजच्या सामन्यात लवलीना काहीशी थकलेली वाटत होती, तरी देखील तिने सामना सुरू ठेवला. मात्र सुरमेनेलीचं पारडं जड ठरल्याने लवलीनाला हार पत्करावी लागली आहे. भारताकडून बॉक्सिंगमध्ये पदक जिंकण्यात केवळ लवलीन यशस्वी ठरली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे तिसरं पदक आहे. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने रौप्य तर बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने (PV Sindhu) कांस्य पदकाची कमाई केली आहे. लवलीनाला मिळालेलं हे कांस्यपदक गेल्या नऊ वर्षांत ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगसाठी मिळालेलं हे पहिलं पदक आहे. लवलीनाच्या कामगिरीबाबत देशभरातून तिचं कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लवलीनाचं कौतुक करणारं ट्वीट केलं आहे. लवलीनाने क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या नीन चिन चेनला हरवून एक पदक निश्चित केलं होते. त्यावेळी 23 वर्षीय लवलीनाने विजेंदर सिंह (बीजिंग 2008) आणि एमसी मेरी कोम (लंडन 2012) यांच्या विजयाशी बरोबर केली होती. तुर्कीची बॉक्सर बुसेनाझ सुरमेनेली 2019 मध्ये चॅम्पियनशीप विजेती होती, त्यावेळी लवलीनाला कांस्य पदक मिळाले होते. तेव्हा या दोघींचा सामना झाला नव्हता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: