विश्वास बसणार नाही; 60 लाख मोबाईलच्या भंगारातून बनवली ऑलिंपिकची पदकं!

विश्वास बसणार नाही; 60 लाख मोबाईलच्या भंगारातून बनवली ऑलिंपिकची पदकं!

टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत विजेत्यांनी दिली जाणारी पदके जुन्या मोबाईल आणि टॅबलेट्समधून मिळालेल्या धातूंपासून तयार करण्यात आली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जुलै: टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympic 2020) स्पर्धेला एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेच्या आयोजकांनी ऑलिंपिक स्पर्धेतील पदकांचे डिझाईन प्रसिद्ध केले आहेत. ऑलिंपिक पदक हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. जागतीक पातळीवरील सर्वोत मोठ्या अशा या स्पर्धेत पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यंदाच्या स्पर्धेतील पदक हे खास असणार आहे. या पदकांच्या वैशिष्ट्यांचा खुलासा आयोजकांनी केला आहे.

टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत विजेत्यांनी दिली जाणारी पदके जुन्या मोबाईल आणि टॅबलेट्समधून मिळालेल्या धातूंपासून तयार करण्यात आली आहेत. स्पर्धेच्या आयोजकांनी एप्रिल 2017मध्ये जुनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस देण्यासाठी कॅम्पेन सुरु केले होते. आयोजकांच्या या आवाहनाला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आयोजकांकडे 78 हजार 895 टन गॅजेट्स जमा झाले. या गॅजेट्समध्ये 60 लाख मोबाईल फोन देखील होती आणि सर्वांमधून 32 किलो सोनं, 3 हजार 500 किलो चांदी आणि 2 हजार 200 किलो तांबे काढण्यात आले.

गॅजेट्समधून मिळालेल्या धातूंमधून ऑलिंपिकसाठीच्या पदकांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. यंदाच्या पदकांचे डिझाईन जुनुची कावानिसी यांनी केले आहे. कावानिसी यांची निवड 400हून अधिक डिझाईनर्समधून केली आहे. स्पर्धेतील प्रत्येक सुवर्णपदकामध्ये 6 ग्रॅम अधिक सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या सुवर्णपदकामध्ये शुद्ध गोल्ड प्लेटिंग करण्यात आले आहे. तर रौप्य पदक शुद्ध चांदीपासून तयार करण्यात आले आहे. कांस्य पदकात 95 टक्के तांबे आणि 5 टक्के जस्तचा वापर केला आहे.

कधी सुरू होणार स्पर्धा

पुढील वर्षी 24 जुलैपासून टोकिओत ही स्पर्धा सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नियमानुसार पदकाचे डिझाईन असले पाहिजे. पदकात 5 रिंग्स, स्पर्धेचे अधिकृत नाव, पॅनाथिनियाक स्टेडियममधील देवीचा फोटो आवश्यक असतो. अर्थात पदकांमध्ये रिसायकल केलेल्या मेटल्सचा वापर करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी रिओ डि जनरो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत देखील अशा प्रकारच्या मेटल्सचा वापर करण्यात आला होता. पण तेव्हा सुवर्ण आणि रौप्य पदक तयार करताना 30 टक्केपेक्षा कमी रिसायकल केलेल्या मेटल्सचा वापर केला गेला होता. टोकिओ स्पर्धेत सर्व पदके रिसायकल केलेल्या धातूंपासून तयार करण्यात आली आहेत. 24 जुलै 2020पासून सुरू होणारी ही स्पर्धा 9 ऑगस्ट 2020 रोजी संपणार आहे.

VIDEO : शिकलो पण नोकरी नाही, पेरलं तर पाऊस नाही; बळीराजाचा लेक रडला!

First published: July 24, 2019, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading