मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Pak: मैदानात उतरताच विराट ठोकणार ‘शतक’, नावावर होणार हा मोठा विक्रम

Ind vs Pak: मैदानात उतरताच विराट ठोकणार ‘शतक’, नावावर होणार हा मोठा विक्रम

विराट कोहली

विराट कोहली

Ind vs Pak: दुबईत होणाऱ्या आजच्या भारत-पाक सामन्यात विराटच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. आजवरच्या कारकीर्दीत विराटनं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पण आज तो आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दुबई, 28 ऑगस्ट: भारत आणि पाकिस्तान संघातला महामुकाबला सुरु होण्यास आता फक्त काही तास उरले आहेत. आशिया चषकातल्या टीम इंडियाच्या या सालामीच्याच सामन्यात गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. याच सामन्यात विराटच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. आजवरच्या कारकीर्दीत विराटनं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आणि आज दुबईच्या मैदानात तो आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.

विराटचा शतकी सामना

विराट कोहलीनं आतापर्यंत 99 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा भारत-पाक संघांमधला सामना हा विराटच्या कारकीर्दीतला शंभरावा सामना ठरणार आहे. त्यामुळे आज दुबईच्या मैदानात उतरताच विराटच्या नावे एक नवा विक्रम जमा होईल. शंभर आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा विराट हा भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरणार आहे. विराटच्या आधी रोहित शर्मानं आतापर्यंत 132 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेले आहेत.

हेही वाचा - Ind vs Pak: आशिया कपसाठी विराटनं निवडली नवी बॅट, किती आहे विराटच्या या खास बॅटची किंमत?

दुबईत विराट मॅजिक?

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा फॉर्मात यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. आगामी आशिया चषकात विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. महत्वाचं म्हणजे आशिया चषक विराटसाठी लकी आहे.

  • आशिया चषकात विराटनं आतापर्यंत 16 सामन्यात 766 धावा ठोकल्या आहेत.
  • सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो सचिन आणि रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • विराटनं आशिया चषकात तीन शतकं आणि दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
  • 2012 साली पाकिस्तानविरुद्ध केलेली 183 धावांची खेळी ही आशिया चषकातली आणि विराटची वन डेतली सर्वोत्तम खेळी.
  • आशिया चषकात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा मान विराटकडेच आहे. त्यानं आतापर्यंत पाच वेळा सामनावीराचा बहुमान मिळवलाय.
  • 2018 सालच्या आशिया चषकातून विराटनं माघार घेतली होती. पण यंदाच्या आशिया चषकासाठीच्या संघात विराटचा समावेश आहे.

First published:

Tags: Asia cup, India vs Pakistan, T20 cricket, Virat kohli