हॅपी बर्थडे मास्टर ब्लास्टर सचिन!

हॅपी बर्थडे मास्टर ब्लास्टर सचिन!

तमाम क्रिकेट चाहत्यांचा देव सचिन तेंडुलकर याचा 44वा वाढदिवस.

  • Share this:

24 एप्रिल : तमाम क्रिकेट चाहत्यांचा देव सचिन तेंडुलकर याचा 44वा वाढदिवस.  त्याला मिळालेली ही देवाची उपाधी त्याच्या जिद्दीमुळे. 2011मध्ये विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं.

1973मध्ये मध्यमवर्गात सचिनचा जन्म झाला. 'प्लेइंग इट माय वे' पुस्तकातून सचिन उलगडत जातो. त्याचे लहानपणीचे अनुभवही संस्मरणीय आहेत.

लहानपणी त्याला सायकल हवी होती. वडिलांनी ती द्यायला नकार दिला तला पठ्ठ्या घराबाहेर खेळायला जायचा बंद झाला. घरातूनच तो बाहेरच्या मुलांना पाहायचा. एकदा गॅलेरीच्या ग्रिलमधून त्यानं डोकं बाहेर काढलं आणि ते अडकलं. मग 30 मिनिटं घरातल्यांच्या नाकीनऊ आले.

सचिन म्हणतो, ' तेव्हा फारसं कळायचं नाही. वडिलांची परिस्थिती नव्हती तरीही त्यांनी मला सायकल घेऊन दिली.' पण सायकल चालवताना सचिन पडला आणि मग तो बरा होईपर्यंत त्यानं सायकलला हातही लावला नाही.

सचिनच्या जिद्दी स्वभावानंच त्याला यशाच्या शिखरावर नेलं. सचिनच्या स्वभावतले हे पैलू ' सचिन अ बिलियन डाॅलर ड्रीम्स' सिनेमात पाहायला मिळणार आहेत. 26 मे रोजी सिनेमा रिलीज होतोय.

सचिन म्हणतोय, ' या सिनेमात फक्त माझं करियर नाही तर अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. '

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 11:45 AM IST

ताज्या बातम्या