आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस

आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस

भारताला टी20वर्ल्ड कप,वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार म्हणजे धोनी. तो कॅप्टन असतानाच भारताची टीम वनडे आणि टेस्ट क्रिकेट दोन्हीमध्ये नंबर 1 होती.

  • Share this:

07जुलै : सचिन तेंडुलकरनंतर जात-पात धर्म या साऱ्याच्या पलिकडे जाऊन कुठला क्रिकेटर लोकप्रिय होईल असा कुणी विचारही केला नव्हता. पण असा एक खेळाडू झाला. हा खेळाडू आपल्या खेळासोबतच आपल्या लीडरशीपच्या गुणांमुळे प्रसिद्ध झाला. हा खेळाडू म्हणजे भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. आज धोनीचा 36वा वाढदिवस आहे.

भारताला टी20वर्ल्ड कप,वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार म्हणजे धोनी. तो कॅप्टन असतानाच भारताची टीम वनडे आणि टेस्ट क्रिकेट दोन्हीमध्ये नंबर 1 होती. म्हणजेच क्रिकेटमधलं असं कुठलंही टायटल उरलं नाही जे धोनीने भारतासाठी मिळवलं नाही. क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वोत्कृष्ट अशा स्टीव्ह वॉ आणि इम्रान खान या कर्णधारांचे गुण महेंद्रसिंग धोनीमध्ये दिसतात.

पाकिस्तानचे पूर्व क्रिकेटर मुश्ताक अहमदनेही धोनीचं कौतुक केलंय, ते म्हणतात , 'धोनी हा एक अत्यंत संयमी कर्णधार आहे. यशाने तो हुरळूनही जात नाही आणि अपयशाने तो दु:खीही होत नाही. त्याच्या कॅप्टनसीत आणि इम्रान खानच्या कॅप्टनसीत बरंच साम्य आहे'.तर धोनीसोबतच खेळणाऱ्या आकाश चोपडा म्हणतो की क्रिकेट खेळताना धोनीने लांब केस फक्त ठेवलेच नाही तर काही वर्षात हे लांब केसही भारतातली एक लोकप्रिय हेअर स्टाइलही झाली. धोनीचा स्वत: एक वेगळा अंदाज आहे.

धोनीचं सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे टीम जिंकल्यावर सगळं श्रेय तो त्याच्या टीम प्लेअर्सला द्यायचा तर पराभवाचं श्रेय मात्र स्वत:कडे घ्यायचा. आता त्याच्याच पायावर पाय ठेवून विराटही पुढे चालला आहे.भारताचे पुर्व कोच ग्रेग चॅपल आणि गॅरी कर्स्टनही धोनीच्या विरोधात कधी गेले नाहीत.

कोणी काहीही म्हणू दे, पण रांचीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धोनीने त्याच्या नावाप्रमाणेच सारं क्रिकेट विश्व आपलंसं केलंय. त्यानं लोकांची मनंही जिंकली आणि क्रिकेटचा खेळही जिंकला .

First published: July 7, 2017, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading