हाॅकीच्या मैदानातही भारत-पाकिस्तान महामुकाबला

हाॅकीच्या मैदानातही भारत-पाकिस्तान महामुकाबला

पुरुषांच्या जागतिक हॉकी लीगच्या सेमीफायनलमध्ये ब गटातील साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगणार आहे.

  • Share this:

18 जून : भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज रंगणाऱ्या जुगलबंदीमुळे लंडन शहरात आशियाई रंगांची उधळण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान जेतेपदासाठी भिडतायत, तर दुसरीकडे लंडनमध्ये हेच प्रतिस्पर्धी हॉकी मैदानावरही एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतील.

पुरुषांच्या जागतिक हॉकी लीगच्या सेमीफायनलमध्ये ब गटातील साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगणार आहे. या स्पर्धेतील कामगिरी पाहता भारताचे पारडे जड मानले जात असले तरी पाकिस्तान संपूर्ण ताकदीने शेजाऱ्यांना नमवण्यासाठी सज्ज आहेत.

First published: June 18, 2017, 6:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading