भारतीय महिला संघाचा आज चौकार?

भारतीय महिला संघाचा आज चौकार?

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात मिताली राजची टीम इंडिया आज श्रीलंकेशी भिडणार आहे.

  • Share this:

05 जुलै: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात मिताली राजची टीम इंडिया आज श्रीलंकेशी भिडणार आहे. भारताच्या महिला ब्रिगेडनं सलग तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या तीन संघांना धूळ चारली आहे.

श्रीलंकेला हरवल्यास सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी भारताला मिळणार आहे. त्यामुळे आज महिला भारतीय संघ विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झालीय.

तर मराठीमोळी स्मृती मानधना, पूनम राऊत यांच्यासह कर्णधार मिताली राज, एकता बिस्त, हरमनप्रीत कौर आणि झूलन गोस्वामी यांच्या खेळाकडे सर्वांच्या नजरा असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 10:42 AM IST

ताज्या बातम्या