क्रीडाप्रेमींसाठी सुपर सन्डे! क्रिकेट आणि बॅडमिंटनच्या सामन्यांची मेजवानी

क्रीडाप्रेमींसाठी सुपर सन्डे! क्रिकेट आणि बॅडमिंटनच्या सामन्यांची मेजवानी

आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. तरदुसरीकडे पी. व्ही. सिंधू इंडिया ओपन महिला स्पर्धेच्या अंतिम सामना खेळणार आहे.

  • Share this:

04 फेब्रुवारी : आज क्रीडाप्रेमींसाठी सुपर सन्डे आहे. कारण आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. तरदुसरीकडे पी. व्ही. सिंधू इंडिया ओपन महिला स्पर्धेच्या अंतिम सामना खेळणार आहे.

भारतानं पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सहा सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतलीय. आफ्रिकेचे मातब्बर फलंदाज सध्या दुखापतींनी त्रस्त आहेत. एबी डीव्हिलियर्सनंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसनंही एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिेकेला धक्का बसलाय. तर दुसरीकडे फेब्रुवारी 2016 पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपराजित राहण्याची दक्षिण आफ्रिकेची मालिका खंडित केल्यानं भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

तर गतविजेती आणि अव्वल मानांकीत पी. व्ही. सिंधू हिनं इंडिया ओपन महिला बॅडमिंटन स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्य फेरीत तिनं रॅटचॅनॉक इंटाननचा 21-13, 21-15 असा पराभव केला.

First published: February 4, 2018, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading