Home /News /sport /

मांकडिंग आऊट झाल्यानंतर संतापला धोनीचा सहकारी, मैदानातच केले अश्लिल इशारे

मांकडिंग आऊट झाल्यानंतर संतापला धोनीचा सहकारी, मैदानातच केले अश्लिल इशारे

तामीळनाडू प्रीमियर लीगचा (TNPL) सहावा मोसम सुरू झाला आहे. नेल्लई रॉयल किंग्स आणि चेपॉक सुपर गिल्लीज यांच्यात पहिला सामना झाला.

    मुंबई, 24 जून : तामीळनाडू प्रीमियर लीगचा (TNPL) सहावा मोसम सुरू झाला आहे. नेल्लई रॉयल किंग्स आणि चेपॉक सुपर गिल्लीज यांच्यात पहिला सामना झाला. मॅच टाय झाल्यानंतर निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये रॉयल किंग्सने बाजी मारली, पण या मॅचमध्ये मोठा वाद झाला. रॉयल टीमला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 10 रनची गरज होती, ज्याला रॉयलने 1 बॉल शिल्लक असताना पार केलं. त्याआधी चेपॉक सुपर गिल्लीजला 185 रनचं आव्हान मिळालं होतं. शेवटच्या बॉलवर टीमला विजयासाठी 5 रनची गरज होती, तेव्हा चेपॉकचा बॅट्समन एस हरीश कुमारने फोर मारून मॅच टाय केली. यानंतर सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) सीएसकेमध्ये असलेला खेळाडू एन जगदीशन (N Jagadeesan) मांकडिंग आऊट झाला. यानंतर त्याने मिडल फिंगर दाखवून अश्लिल इशारा केला. जगदीशन याने चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर अशापद्धतीने आऊट झाल्यामुळे जगदीशन भडकला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना जगदीशनने एनआरकेच्या खेळाडूंकडे बघून वारंवार अश्लिल इशारे केले. पहिले बॅटिंग करताना रॉयल किंग्सने चेपॉक सुपर गिल्लीजसमोर 185 रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेपॉक सुपर गिल्लीज 184 रन बनवू शकली. एन जगदीशनने 26 प्रथम श्रेणी, 36 लिस्ट ए आणि 45 टी-20 मॅचमध्ये तामीळनाडूचं प्रतिनिधीत्व केलं आहे. जगदीशनच्या या कृतीमुळे त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आयपीएलमध्ये जगदीशन 2018 पासून सीएसकेच्या टीमचा भाग आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या