बहिष्कार न घालता पाकिस्तानची जिरवा - सचिन

बहिष्कार न घालता पाकिस्तानची जिरवा - सचिन

सामना खेळून पाकिस्तानची जिरवा असं मत सचिननं व्यक्त केलं आहे.

  • Share this:

मुंबई 22 फेब्रुवारी - पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून विविध पातळीवर पाकिस्तानची नाकाबंदी सुरू आहे. त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये देखील क्रिकेट सामना न खेळण्याचा विचार सुरू केला आहे. यावर आता संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायाला मिळत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं देखील भारताच्या क्रिकेट डिप्लोमसीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. 'वर्ल्डकपमध्ये न खेळता पाकिस्तानला दोन पॉईंट देण्यामध्ये काय अर्थ आहे? त्यापेक्षा पाकिस्तानचा पराभव करा आणि त्यांची जागा त्यांना दाखवून द्या. वर्ल्डकपचा इतिहास पाहता भारतानं पाकिस्तानला कायम चारी मुंड्या चित केल्या आहेत' असं मत सचिननं व्यक्त केलं आहे.

दरम्यान, यापूर्वी लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी देखील भारताच्या क्रिकेट डिप्लोमसीबद्दल बोलताना 'पराभूत करून पाकिस्तानला धडा शिकवा' असं मत मांडलं होतं. पण, सध्या मात्र क्रिकेटबद्दल काहीशा संमिश्र अशा प्रतिक्रिया पुढे येत आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननं देखील 'क्रिकेट खेळून पाकिस्तानला धडा शिकवा' असं म्हटलं आहे.

गांगुली, हरभजनला काय वाटतं?

दादा अर्थात सौरव गांगुली आणि भज्जी म्हणजेच हरभजनसिंगनं भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये असं मत मांडलं आहे. पाकिस्तानविरोधात न खेळल्यानं भारताच्या गुणांवर काहीही परिणाम होणार नाही असं मत दोघांनी व्यक्त केलं आहे. तर, देशापुढे आम्ही कशालाच महत्त्व देत नाही असं भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे.

भारतानं पाकिस्तानशी खेळावं का नाही? यावर सध्या क्रिकेट जगतात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत.

पाकविरोधात भारत आक्रमक

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहेत.मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात कर लावण्यात आला आहे. तर, गुरूवारी रावी नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे. दरम्यान पाकच्या दुटप्पीपणाबद्दल आता भारत संयुक्त राष्ट्रसंघात देखील आवाज उठवणार आहे. दरम्यान, फ्रान्स आणि चीननं देखील भारताला आता पाठिंबा दिला आहे.

Special Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा

First Published: Feb 22, 2019 06:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading