• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • आधी फायनल जिंकली आता मन! टीम साऊदीचं काम पाहून सलाम कराल

आधी फायनल जिंकली आता मन! टीम साऊदीचं काम पाहून सलाम कराल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) जिंकल्यानंतर न्यूझीलंडची टीम मायदेशात पोहोचली आहे. घरी परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये किवी टीमचा फास्ट बॉलर टीम साऊदीने (Tim Southee) कौतुकास्पद पाऊल उचललं आहे.

 • Share this:
  ऑकलंड, 29 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) जिंकल्यानंतर न्यूझीलंडची टीम मायदेशात पोहोचली आहे. घरी परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये किवी टीमचा फास्ट बॉलर टीम साऊदीने (Tim Southee) कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. 8 वर्षांच्या एका मुलीवर दुर्मीळ अशा कॅन्सरवर उपचार करण्यासाठी साऊदी पुढे आला आहे. या मुलीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत व्हावी, म्हणून साऊदी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये त्याने घातलेल्या जर्सीचा लिलाव करणार आहे. होली बीटी हिला 2018 पासून कॅन्सरमधला एक दुर्मिळ आजार असलेल्या न्यूरोब्लास्टोमाने ग्रासलं आहे. दोन वर्षांपूर्वी आपल्याला या मुलीच्या आजाराबद्दल कळलं, तेव्हापासून मी तिची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. बीटीला मदत व्हावी, म्हणून मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या जर्सीचा लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम बीटीच्या परिवाराला दिली जाईल, असं साऊदी त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला. लिलाव होणाऱ्या या जर्सीमध्ये न्यूझीलंड टीमच्या सगळ्या खेळाडूंनी स्वाक्षरी केली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Tim Southee (@tim_southee)

  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम साऊदीने पहिल्या इनिंगमध्ये 1 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट घेत भारताच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. याचसोबत त्याने बॅटिंगमध्येही 46 बॉलमध्ये 30 रनची महत्त्वाची खेळी केली. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला.
  Published by:Shreyas
  First published: