• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सिगरेट पिण्यासाठी 3 खेळाडूंनी तोडला बायो-बबलचा नियम, इंग्लंडच्या रस्त्यावर दिसले क्रिकेटपटू

सिगरेट पिण्यासाठी 3 खेळाडूंनी तोडला बायो-बबलचा नियम, इंग्लंडच्या रस्त्यावर दिसले क्रिकेटपटू

श्रीलंकन क्रिकेट पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या तीन खेळाडूंनी बायो-बबलचा नियम तोडल्यामुळे त्यांना टीममधून बाहेर करण्यात आलं आहे.

 • Share this:
  लंडन, 28 जून : श्रीलंकन क्रिकेट पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या तीन खेळाडूंनी बायो-बबलचा नियम तोडल्यामुळे त्यांना टीममधून बाहेर करण्यात आलं आहे. कुशल मेंडिस (Kusal Mendis), निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि धनुष्का गुणतिलका (Danushka Gunathilaka) यांना ताबडतोब श्रीलंकेमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा पराभव झाला, यानंतर हे तिघं डरहमच्या रस्त्यावर फिरताना दिसले. मेंडिस, डिकवेला आणि गुणतिलका तिसरी टी-20 खेळले होते. तिसऱ्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा 89 रननी दारूण पराभव झाला होता. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डिसिल्व्हा म्हणाले, 'श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने कुशल मेंडिस, धनुष्का गुणतिलका आणि निरोशन डिकवेला यांना बायो-बबलचा नियम तोडल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे आणि त्यांना श्रीलंकेला परतायला सांगण्यात आलं आहे. समोर आलेल्या व्हिडिओची तपासणी केली जात आहे. या तिघांनी आचार संहितेचं उल्लंघन केलं आहे.' श्रीलंकेच्या एका चाहत्याने तिन्ही खेळाडू बाहेर फिरत असल्याचा व्हिडिओ टाकला होता. या व्हिडिओमध्ये खेळाडू सिगरेट पिताना दिसत आहेत. शनिवारी संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा 3-0 ने मानहानीकारक पराभव झाला. ऑक्टोबर 2020 पासून श्रीलंका लागोपाठ 5 टी-20 सीरिज हरली आहे. आता इंग्लंड आणि त्यांच्यात 3 वनडे मॅचच्या सीरिजला 29 जूनपासून सुरुवात होईल. मेंडिस, डिकवेला आणि गुणतिलका हे तिघं टी-20 सीरिजमध्ये फ्लॉप ठरले. मेंडिसने 3 सामन्यांमध्ये फक्त 54 रन केले, तर डिकवेलाने 2 मॅचमध्ये 14 रन आणि गुणतिलकाने 3 मॅचमध्ये 26 रन केले.
  Published by:Shreyas
  First published: