मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 स्पर्धेत 'हे' तीन खेळाडू तब्बल 10 वर्षांनी पुनरागमन करणार?

IPL 2022 स्पर्धेत 'हे' तीन खेळाडू तब्बल 10 वर्षांनी पुनरागमन करणार?

आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर काही महिन्यानंतरच 2022 मधील स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, यावेळी दोन नवीन संघांचा समावेश होतो आहे. सोबत तीन खेळाडू तब्बल 10 वर्षांनी IPL मध्ये पुनरागमन करणार आहेत.

आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर काही महिन्यानंतरच 2022 मधील स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, यावेळी दोन नवीन संघांचा समावेश होतो आहे. सोबत तीन खेळाडू तब्बल 10 वर्षांनी IPL मध्ये पुनरागमन करणार आहेत.

आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर काही महिन्यानंतरच 2022 मधील स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, यावेळी दोन नवीन संघांचा समावेश होतो आहे. सोबत तीन खेळाडू तब्बल 10 वर्षांनी IPL मध्ये पुनरागमन करणार आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 नोव्हेंबर: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल मॅचेस (IPL Matches) ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असते. आयपीएल सीझन अनेक अर्थांनी नेहमीच चर्चेत असतो. क्रिकेटविश्वाला आता आयपीएल 2022 चे (IPL 2022) वेध लागले आहेत. अर्थात त्याला अजून बराच अवधी असला, तरी नव्या टीम्सचा समावेश झाल्याने काही खेळाडू कायम राहणार असून, काही खेळाडू पुनरागमन करतील. तसंच काही नवे खेळाडू आयपीएलसाठी टीममध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. अर्थात या सर्व बाबी लिलाव अर्थात ऑक्शनवर (Auction) अवलंबून असतील. त्यामुळे लिलाव नेमका कसा होईल, कोणत्या खेळाडूवर किती बोली लागू शकेल, हेदेखील चर्चिलं जात आहे. दरम्यान आयपीएलमध्ये तीन खेळाडू सुमारे 10 वर्षांनंतर पुनरागमन करू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. यात फिडेल अॅडवर्ड्स, मॅथ्यू वेड आणि श्रीकांत वाघ यांचा समावेश आहे.

पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये कोणते खेळाडू सहभागी होतील याविषयीचा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जात आहे. यात काही जुन्याजाणत्या, तर काही नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. डावखुरा वेगवान बॉलर (Fast Bowler) श्रीकांत वाघने (Shrikant Wagh) नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021-22 मध्ये गोव्यात दमदार खेळी केली. 33 वर्षांच्या या खेळाडूनं 5 मॅचेसमध्ये 10 विकेट्स घेतल्या. वाघने ग्रुप स्टेजमध्ये तमिळनाडूविरुद्ध चार विकेट्स घेतल्या आणि तमिळनाडू संघाला पराभूत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. श्रीकांत वाघ 2011 मध्ये पुणे वॉरियर्स (Pune Warriors) संघाकडून शेवटची आयपीएल मॅच खेळला होता. 2010 मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघासाठीदेखील (Rajasthan Royals) खेळला होता. त्यामुळे सुमारे 10 वर्षांनंतर कोणती टीम श्रीकांतला आयपीएलमध्ये समाविष्ट करून घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

धोनीचा मास्टर स्ट्रोक, मुंबई इंडियन्सच्या ट्रम्प कार्डला देणार CSK मध्ये एन्ट्री

39 वर्षांचा वेगवान बॉलर फिडेल एडवर्ड्सने (Fiddle Edwards) या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. एडवर्ड्सने वेस्ट इंडिजविरुद्ध होम पीचवर टी-20 सीझनमध्ये अनेक प्रभावी स्पेल टाकले. 2009 मध्ये एडवर्ड्स डेक्कन चार्जर्स संघाकडून शेवटची आयपीएल मॅच खेळला होता. त्याच वर्षी एडवर्ड्सनं ट्रॉफीदेखील जिंकली होती. त्यामुळे आयपीएल सीझन 2022 मध्ये तो कोणत्या टीमकडून खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विराटसमोर धर्मसंकट,आवडत्या खेळाडूंमध्ये कुणाची करणार निवड आणि कुणाला देणार अंतर?

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर (Wicket keeper) मॅथ्यू वेडनं (Matthew Wed) या महिन्याच्या सुरुवातीला टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup) 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन टीमच्या विजयात मोठं योगदान केलं. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये वेडनं केलेले 41 रन्स ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरले आणि टीम केवळ फायनलला पोहोचली नाही तर तिने टुर्नामेंटही जिंकली. आयपीएल 2011 मध्ये मॅथ्यू वेड दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून तीन मॅचेस खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये सहभागी झालेला नाही. टी-20 वर्ल्ड कपमधला त्याचा धमाकेदार खेळ पाहता आयपीएल 2022 साठीच्या लिलावात त्याला मोठी रक्कम मिळवण्याची निश्चित संधी असेल. त्यामुळे सुमारे 10 वर्षांनंतर हा खेळाडू आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Ipl, Ipl 2022, Ipl 2022 auction