VIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद

VIDEO : एकाला शक्य नाही म्हणून दोन खेळाडूंनी केलं 'या' तुफानी फलंदाजाला बाद

संदिप लमीचनेच्या गोलंदाजीमुळं पंजाबचा वादळ शमलं, पण घडल असं काही...

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल : सध्या आयपीएलमध्ये सर्व संघांमध्ये प्ले ऑफकरिता चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळं दिल्ली आणि पंजाब यांच्यात पहिल्या चार मध्ये कायम राहण्याची लढत सुरु आहे. सध्या अंकतालिकेत दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे तर पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

पंजाबनं झटपट दोन विकेट गमवल्यानंतर, फलंदाजीची धुरा सांभाळली ती, ख्रिस गेलनं. ख्रिस गेलनं एकाकी झुंज देत आपली तुफानी फलंदाजी सुरु केली. केवळ 25 चेंडूत त्यानं आपलं शतक पुर्ण केलं.

दरम्यान, हा अडथळा दुर करण्यासाठी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं अगदी मोक्याच्या वेळी पुन्हा संदिपला गोलंदाजी दिली. आणि 13व्या ओव्हरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यानं गेलला बाद केलं. ही झेल अगदीच मजेशीर झाली. याआधी आयपीएलमध्ये आपण एकसो एक झेल पाहिले आहेत. एका हातानं, सुपरमॅन सारखा हवेत, पण गेलला बाद करण्यासाठी आज दिल्लीच्या तीन खेळाडूंना मदत करावी लागली. इनग्रामनं हवेत सीमा रेषेजवळ झेल घेतला पण सीमा रेषा ओलांडण्याआधी त्यानं अक्सर पटेलकडं चेंडू फेकला आणि त्यानं तो झेल घेतला आणि अखेर गेल बाद झाला.

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होत असलेल्या या सामन्यात दिल्लीनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबची सुरूवात चांगली झाली नाही. अवघ्या 13 धावांवर पंजाबला पहिला धक्का बसला, चांगल्या लयीत असलेला केएल राहुल केवळ 12 धावा करत माघारी परतला. संदीप लामीचनेनं आधी केएल राहुलला बाद केले. त्यानंतर लगेचच मयंक अग्रवालही बाद झाला. त्यानंतर मंदिप सिंग वगळता कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

VIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद

First published: April 20, 2019, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading