S M L

'या' खेळाडूने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कप 2003मध्ये 673 धावा केल्या होत्या. इतक्या धावा एकाच टुर्नामेंटमध्ये करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय खेळाडू होता

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 27, 2018 06:30 PM IST

'या' खेळाडूने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

27 फेब्रुवारी:  नुकतीच विजय हजारे क्रिकेट टुर्नामेंट पार पडली. ही टुर्नामेंट कर्नाटकने जिंकली.पण या स्पर्धेत कर्नाटकच्या एका स्पर्धकाने सचिन तेंडुलकरचा 2003 सालचा रेकॉर्ड मोडला आहे.

सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कप 2003मध्ये 673 धावा केल्या होत्या. इतक्या धावा एकाच टुर्नामेंटमध्ये करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव  भारतीय खेळाडू होता. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी हा रेकॉर्ड कर्नाटकच्या एका खेळाडूने मोडला आहे. त्याने हजारे रणजी टुर्नामेंटमध्ये एकूण 726 धावा केल्या.  एकाच टुर्नामेंटमध्ये 700 हून  अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला.

इतका मोठा धावांचा डोंगर उभा करणाऱ्या या खेळाडूचं नाव मयांक अग्रवाल आहे. त्याने या टुर्नामेंटमध्ये 3 शतक तर चार अर्धशतक ठोकले. गेल्या दोन वर्षात त्याने एकूण 2000हून अधिक धावा केल्या आहेत. तो कर्नाटकचा ओपनिंग बॅट्समन आहे. एकूण सगळ्या मॅचेसमध्ये त्याचा फॉर्म चांगला होता.

आता येत्या काळात मयांक भारतासाठी खेळतो का आणि आणखी रेकॉर्ड बनवतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2018 06:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close