...'ही' दोन भावंडं जडेजावर भलतीच भडकली,व्हिडिओ झाला व्हायरल

...'ही' दोन भावंडं जडेजावर भलतीच भडकली,व्हिडिओ झाला व्हायरल

एका लहान मुलाचा आणि त्याचा लहान भावाचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • Share this:

20 जून : जेव्हा जेव्हा भारत -पाकिस्तानची  क्रिकेट मॅच असते तेव्हा तर क्रिकेटच्या वेडाला काही मर्यादाच नसतात. हरणं भारतीयांना मंजूरच नसतं आणि त्यातही जर भारत हरलाच तर मग कुठे टी.व्ही फोडले जातात,तर सोशल मिडीयावर शिव्यांची लाखोली वाहिली जाते.

आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत हरला. त्यात ही मॅचमध्ये हार्दिक पांड्या नाहक रनआउट झाला. याला कारण होता जडेजा. त्यामुळे जडेजावर सगळ्या देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. पण सध्या सोशल मीडियावर गाजतेय एका लहान मुलाची प्रतिक्रिया.

एका लहान मुलाचा आणि त्याचा लहान भावाचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत तो मुलगा जडेजाला फार शिव्या देतोय. त्याचा भाऊ तर आता जडेजाला कोहली खूप मारेल बघ इतपत बोलून जातो. 10 लाख लोकांपर्यंत या व्हिडिओला व्ह्युज मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...