इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया World Cup भारतच जिंकणार, 'हा' घ्या ठोस पुरावा!

इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया World Cup भारतच जिंकणार, 'हा' घ्या ठोस पुरावा!

वर्ल्ड कपमधील कामगिरीचा विचार करता एकच संघ आहे जो विजेतेपदाचा खराखुरा दावेदार आहे.

  • Share this:

लंडन, 08 जुलै: ICC Cricket World Cupमध्ये अंतिम फेरीसाठी भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार संघात लढत होत आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या चार पैकी कोणते दोन संघ अंतिम फेरीत जातील याबद्दल उत्सुकता आहे. प्रत्येक संघातील चाहत्यांना वाटते की त्यांचा संघ विश्वविजेता होणार. वर्ल्ड स्पर्धेच्या जेतेपदावर नजर टाकल्यास आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. त्या पाठोपाठ भारत, वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी दोन वेळा तर श्रीलंका, पाकिस्तान यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवले आहे. यावेळी विजेता कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सट्टेबाजार देखील तेजीत आहे.

वर्ल्ड कपमधील कामगिरीचा विचार करता एकच संघ आहे जो विजेतेपदाचा खराखुरा दावेदार आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाने 9 सामने खेळले आहेत. अर्थात काही सामने पावसामुळे रद्द झाले तरी प्रत्येक संघाने किमान 8 सामने खेळले आहेत. साखळी सामने झाल्यानंतर सेमीफायनमध्ये पोहोचलेल्या संघांचा विचार करता एकच संघ आहे जो विजेतेपदाचा खरा दावेदार आहे. हा संघ केवळ कागदावरच नाही तर मैदानातील कामगिरीवर देखील शेर ठरला आहे. मैदानातील कामगिरीचा विचार केल्यास भारतीय संघच वर्ल्ड कपचा खरा दावेदार आहे.

हा घ्या पुरावा

भारतीय संघाने साखळी फेरीतील 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना रद्द तर एकात पराभव झाला आहे. भारताच्या विजयाची सरासरी 85.71 इतकी आहे. भारताच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांची विजयाची सरासरी 77.49 इतकी आहे.

सेमीफायनमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची भारताची कामगिरी ही चांगली आहे. दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत 106 सामने झाले आहेत. त्यापैकी 55 सामन्यात भारताने तर न्यूझीलंडने 45 सामन्यात विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना टाय तर पाच सामने रद्द झाले आहेत. आयसीसी क्रमवारीचा विचार केल्यास भारतीय संघ दुसऱ्या तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. यामुळे सेमीफायनल लढतीत भारतच जिंकण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामन्यासाठीचा मुख्य दिवस वगळता आणखी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. दोन्ही दिवस पावसामुळे वाया गेले तरी भारत सरासरीच्या जोरावर अंतिम फेरी गाठले.

कसे असेल अंतिम फेरीचे चित्र..

अंतिम फेरीत भारताची लढत इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध होणार आहे. स्पर्धेतील आतापर्यंतचे चित्र पाहता दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. साखळी सामन्यात देखील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. ऑस्ट्रेलिया संघाचा सध्याचा फॉर्म पाहता तेच अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. तसे झाले तर अंतिम लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात भारताने दणदणीत विजय विजय मिळवला होता. त्यामुळे येथे देखील भारतच विजेतेपदाचा दावेदार ठरतो.

इंग्लंड अंतिम फेरीत आला तर...

सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन जर यजमान इंग्लंड अंतिम फेरीत दाखल झाले तरी भारताचे पारडे जड आहे. साखळी फेरीत जरी इंग्लंडने भारताचा पराभव केला असला तरी पाकिस्तान आणि श्रीलंके सारख्या संघाविरुद्ध त्यांचा पराभव झाला आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत केलेली दमदार कामगिरी आणि फलंदाज, गोलंदाजांचा फॉर्म पाहता इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना जड जाणार नाही.

VIDEO : 'बारामतीत अजित पवारांचं काम जास्त, 2019 ला त्यांना हरवणं फक्त आशावाद'

First published: July 8, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading