महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली घटना

महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली घटना

जालन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

  • Share this:

रवी जैयस्वाल, प्रतिनिधी

जालना, 22 डिसेंबर : महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच काका पवार यांच्या तालमीतल्या 3 पहेलवानांची माघार घेतल्याची घटना घडली आहे. पंचांकडून अन्याय झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र केसरीचे दावेदार पोपट घोडके, हर्षल सदगिर, अतुल पाटील यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे.

जालना इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी 3 पहेलवालांनी पंचाच्या निकालावर आक्षेप घेतला.  आज माती विभागात उपांत्य फेरीत जालन्याच्या विलास डोईफोडे विरुद्ध पोपट घोडकेची झुंज होती. पण काका पवार यांचा पहेलवान पोपट घोडके मैदानात उतरलाच नाही. पोपट घोडके तीन कुस्त्या जिंकूनही मैदानात हजर न झाल्यानं जालन्याच्या विलास डोईफोडेला विजयी घोषित करण्यात आलं.

तर दुसरीकडे महाराष्ट्र केसरीत उपांत्य फेरी गाठणारा हर्षल सदगिर आणि अतुल पाटील कुस्ती न खेळता पंचांचा निषेध करत तालमीत जाणं पसंत केलं.

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आम्ही बहिष्कार टाकत असल्याचं काका पवार यांनी जाहीर केलं. त्यामुळे त्यांचे तिन्ही मल्लांनी कुस्तीवर बहिष्कार टाकला.

आम्ही इथं कुस्ती खेळण्यासाठी आलो होतो. पण पंच आणि आयोजकांनी दादागिरी सुरू आहे अशी टीका पवार यांनी केली. कुस्ती सुरू असताना पहेलवानाने पाठ ठेकवत नाही तेच पंचांनी शिट्टी वाजवून सामना जिंकल्याचं जाहीर केलं. याला मुळीच काहीही अर्थ नाही. दुसऱ्या पहेलवानाला थोडा तरी वेळ दिला पाहिजे होता. त्यामुळे आमच्यावर हा अन्याय होतोय त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असं पवार यांनी स्पष्ट केलं.

मी इथं कुस्ती खेळण्यासाठी आलो पण इथं अरेरावी सुरू आहे. कुठे धक्काबुक्की केली जात आहे. पंचाकडून निर्णय घेण्यात घाई केली जात आहे असं राष्ट्रकूल विजेता राहुल आवरेनं सांगितलं.

--------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2018 06:30 PM IST

ताज्या बातम्या