ही विकृतीच! धोनीच्या 6 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची धमकी; शिवसेना खासदार भडकल्या

ही विकृतीच! धोनीच्या 6 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची धमकी; शिवसेना खासदार भडकल्या

हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावरुन वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : दिवसेंदिवस सोशल मीडियावर सुरू असलेल्या गुन्ह्यांचे सत्र वाढत असताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या मुलीला सोशल मीडियावरुन बलात्काराच्या धमकीनंतर देशभरातून राग व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही महिलांविरोधात अपशब्दाचा वापर, धमकी आदी गुन्ह्यांमुळे नागरिक संतापले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा 10 धावांनी पराभव झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यानंतर सोशल मीडियावरुन धोनीवर टीका केली जात होती. यातच काही विकृत नेटकाऱ्यांनी चक्क धोनीच्या 6 वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमी दिल्याचा प्रकार समोर आला. यानंतर देशभरात राग व्यक्त केला जात आहे. यावर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा-भारताकडून अंडर-19 खेळलेल्या क्रिकेटपटूचा मृतदेह घरात सापडला

यंदाच्या आयपीएलच्या सामन्यात धोनी फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे धोनीवर सातत्याने टीका केला जात आहे. त्याची परिसीमा म्हणजे काही विकृत नेटकऱ्यांनी चक्क धोनीची 6 वर्षांची मुलगी झिवा हिला बलात्काराची धमकी दिली. यानंतर सोशल मीडियावरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या खासदारांसह अनेकांनी ट्विट करीत यावर चीड व्यक्त केली. सोशल मीडियाच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 10, 2020, 7:22 PM IST

ताज्या बातम्या