एकेकाळी सेल्समॅन होता 'हा' खेळाडू, 37 संघांकडून गाजवतोय क्रिकेटचं मैदान

पाकिस्तान ते साऊथ आफ्रिका असा प्रवास करणारा हा खेळाडू सध्या धोनीचा खास खेळाडू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 10:17 PM IST

एकेकाळी सेल्समॅन होता 'हा' खेळाडू, 37 संघांकडून गाजवतोय क्रिकेटचं मैदान

चेन्नई, 14 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात इमरान ताहीरच्या फिरकी गोलंदाजीनं भल्या भल्या फलंदाजांची झोप उडवली आहे. आपल्या फिरकीच्या जोरावर सध्या हा खेळाडू सध्या आयपीएलच्या हंगामात पर्पल कॅपचा मानकरीही झाला आहे.

मात्र, आज फलंदाजांना गार करणाऱ्या या खेळाडूनं आपल्या आयुष्यात खुप सहन केलं. खुप मेहनत केली त्याची ही कहाणी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ताहिरचा जन्म पाकिस्तानातील लाहोर येथे झाला. घरातल्या सगळ्यात थोरला मुलगा असल्यानं अगदी कमी वयात त्याला नोकरी करावी लागली. 16व्या वर्षीच ताहीर एका मॉलमध्ये सेल्समॅन म्हणून नोकरी करु लागला.


या खेळाडूचं नाव आहे, इमरान ताहीर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात इमरानं आज 27 धावा देत 4 विकेट घेत कोलकाताच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. त्यानं यंदाच्या आयपीएलमधल्या रसेलच्या नावाच्या वादळालाही त्यानं आज गार केलं.ताहीरचं नशीब पलटलं जेव्हा त्याची निवड पाकिस्तानच्या अंडर 19 संघात निवड झाली आणि ते पाकिस्तानच्या ए संघाकडून खेळू लागला. पण पाकिस्तानच्या आतंराराष्ट्रीय संघात त्याची निवड काही झाली नाही. त्यानंतर निराश झालेला ताहीर आपलं नशीब आजमवण्यासाठी थेट साऊथ आफ्रिकेला पोहचला. तब्बल पाच वर्ष ताहीर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आणि अखेर 2011 साली त्यानं साऊथ आफ्रिकेकडून पहिला सामना खेळला.

एवढचं नाही तर ताहीर आजवर जगातील वेगवेगळ्या तब्बल 37 संघांकडून क्रिकेट खेळतो. ताहीर 40 वर्षांचा असला तरी, त्याच्या फेरकीकडं आणि सेलिब्रेशनकडं पाहून तो 20 वर्षांचा वाटतो. वय वर्ष 40 असलेला हा खेळाडू सध्या आयपीएल गाजवतोय. त्याच्या नावावर 66 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.


VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या भाषणात शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे, 5 जण ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 14, 2019 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close