Elec-widget

बांग्लादेशच्या 'या' खेळाडूने आपल्याच चाहत्यालाच चोपला

बांग्लादेशच्या  'या'  खेळाडूने आपल्याच चाहत्यालाच चोपला

बाँग्लादेशच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगच्या सामन्यात ही घटना मागच्या आठवड्यात घडली आहे.

  • Share this:

29 डिसेंबर:आपल्या बॅटने फटाकेबाजी करत आपल्या चाहत्यांची मनं जिंकणारे खेळाडू बरेच असतात. पण आपल्याच चाहत्याला मॅच सुरू असताना चोपण्याचा पराक्रम एका बांग्लादेशच्य केला आहे. बांग्लादेशच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगच्या सामन्यात ही घटना मागच्या आठवड्यात घडली आहे.

या खेळाडूचं नाव आहे शब्बीर रेहमान . हा खेळाडू बांग्लादेशचा एक फलंदाज आहे. तर झालं असं की  मॅच सुरू असताना त्याचा एक चाहता त्याच्याकडे पाहून  दंगा करत होता. याचा बहुतेक शब्बीर साहेबांना राग आला. त्याने अम्पायरला स्टेडिअमच्या बाहेर जाण्याची  परवानगी मागितली. त्याला अम्पायरनेही परवानगी दिली. त्यानंतर स्टेडिअम बाहेर जाऊन  त्याला डिसप्ले स्क्रीनच्या मागे जाऊन जब्बर चोप दिला.

ज्याला त्याने मारले तो शब्बीर रेहमानच्या ओळखीचा असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते  आहे. तर तो त्याला मारत असताना  हे एका  रिझर्व अम्पायरने पाहिलं. त्याने ही माहिती मॅच रेफरीला दिली आहे. मॅच रेफरीने तीच माहिती  बांग्लादेश क्रिकेट समितीचे अध्यक्ष असलेल्या अकराम खान यांना दिली आहे. आता बांग्लादेश  क्रिकेट बोर्ड याबद्दल चौकशीची जबाबदारी आता अनुशासन कमिटीला दिली आहे. त्यामुळे आता ही कमिटी लवकरंच शब्बीरवर कारवाई करू शकते.

त्यामुळे आता हा 'चोप' शब्बीरला चांगलाच महागात पडणार  आहे असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...