IND vs WI : टीम इंडियात हार्दिक पांड्याची कमी पूर्ण करणार 'हे' तीन अष्टपैलू खेळाडू

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे.

  • Share this:

वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामन्यात पराभव मिळाल्यानंतर भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.

या संपूर्ण दौऱ्यात भारताचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याला आराम देण्यात आला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी-20, एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळणार आहे.

पांड्याला टी-20 स्पेशालिस्ट फलंदाज मानले जाते. त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतानं अनेक सामने जिंकले आहेत. मात्र टी-20मध्ये भारताला विजय मिळवून देण्यासाठी या तीन खेळाडूंना पांड्याची जागा घ्यावी लागणार आहे.

हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आले नसले तरी, त्याला मोठा भाऊ कृणाल पांड्याला संघात घेण्यात आले आहे. कृणाल टी-20 फॉरमॅटमध्ये एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो. नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज विरोधातच कृणालनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.  त्यानं 11 सामन्यात 11 विकेट घेत 70 धावा केल्या आहेत.

वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये आपल्या फलंदाजीनं सर्वांचे लक्ष वळवणारा रवींद्र जडेजा टी-20मध्ये फिनीशर मानले जाते. वर्ल्ड कपमध्ये जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जडेजानं 40 टी-20 सामन्यात 116 धावा केल्या आहेत तर 31 विकेट घेतल्या आहेत. मात्र जडेजा शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामना 2017मध्ये खेळला होता.

भारतीय संघात स्थान मिळवलेला युवा खेळाडू वॉशिंग्टन सुंदरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 2018मध्ये निदहास ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयानंतर सुंदरला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. वेस्ट इंडिज विरोधातच सुंदरनं शेवटचा सामना खेळला होता. त्याच्या नावावर 7 सामन्यात 6च्या इकॉनॉमीनं 10 विकेट घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या