Home /News /sport /

क्रिकेट किट घेण्यासाठी नव्हते पैसे; स्कूल व्हॅन चालवणाऱ्या मुलाची IPL मध्ये तुफान चर्चा

क्रिकेट किट घेण्यासाठी नव्हते पैसे; स्कूल व्हॅन चालवणाऱ्या मुलाची IPL मध्ये तुफान चर्चा

वयाच्या 11 व्या वर्षीच प्रियमच्या आईचं निधन झालं. आईचं स्वप्न होतं, की तिच्या मुलानी क्रिकेटर व्हावं.

    नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : लॉकडाउनमध्ये सर्वांना घरात राहून खूपच कंटाळा आला होता. आता थोडं-थोडं अनलॉक होऊ लागलं आहे; परंतु पूर्वीसारखं एकत्र येऊन मज्जा करणं याला अजूनही परवानगी मिळालेली नाही. आता आयपीएलच्या मोसमात तर एकत्र येऊन आयपीएलची मज्जा घेणं, स्टेडिअममध्ये जाऊन आपल्या आवडत्या क्रिकेटरची आणि संघाची मॅच बघणं, हे सगळेच क्रिकेटप्रेमी नक्कीच मिस करत असतील. त्यांना घरी बसूनच आयपीएलचा आनंद घ्यावा लागत आहे. शुक्रवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात क्रिकेटप्रेमींना एका नव्या खेळाडूचा खेळ पाहायला मिळाला असेल. हो! आम्ही प्रियम गर्गबद्दलच बोलतोय. सनरायझर्सचा फलंदाज प्रियम गर्ग. प्रियमनी कालच्या सामन्यात अर्धशतक  केलं. यानंतर त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 26 चेंडूंमध्ये त्याने 51 धावा केल्या. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे, कारण कमी चेंडूंत अर्धशतक केलं. त्यावेळी सनरायझर्स संघाचे नावाजलेले फलंदाज आउट होऊन परतले होते. प्रियमच्या यशामुळे तो चकमत आहे. स्कूल व्हॅन चालवणाऱ्या नरेंद्र गर्ग यांना आपल्या मुलाने केलेल्या कामगिरीचा खूप आनंद होत आहे. प्रियम भारताच्या अंडर 19 संघाचा कर्णधार होता. इथपर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास  काही साधा सुद्धा नव्हता. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले होते. त्याचा संघर्ष नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असेल. हे ही वाचा-IPL 2020 : 140 किमीचा बॉल छातीवर आदळला, पुढच्याच बॉलला बॅट्समनने काय केलं पाहा लहानपणीच आईचा मृत्यू... उत्तर प्रदेशातील मेरठपासून 25 किलोमीटर आत परीक्षितगढ किल्ल्याजवळ प्रियमचं मूळ गाव. वयाच्या 11 व्या वर्षीच प्रियमची आई त्याला सोडून देवाघरी गेली. आईचं स्वप्न होतं, की तिच्या मुलानी क्रिकेटर व्हावं. आईचे स्वप्न तर प्रियमने पूर्ण केलं; परंतु ते पाहायला त्याची आईच या जगात नाही. 2011 साली प्रियमची आई गेली त्यानंतर अभ्यासासोबत त्याने 7 ते 8 तास मैदानात क्रिकेटची प्रॅक्टिस करून 7 वर्षानंतर उत्तर प्रदेशच्या रणजी संघात आपलं स्थान निश्चित केलं. प्रियमचे वडील स्कूल व्हॅन चालवायचे... प्रियमला पाच भावंडं, कुटुंब मोठं आहे. प्रियमचे वडील नरेश गर्ग स्कूल व्हॅन चालवायचे. स्कूल व्हॅन चालवून घर खर्च काही भागत नव्हता; परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी प्रियमला त्याच्या स्वप्नांपासून दूर ठेवलं नाही. त्याचं स्वप्न साकारायला त्यांनी खूप कष्ट घेतले. वयाच्या 6 व्या वर्षी त्याला क्रिकेटच्या कोचिंग क्लासेसला त्यांनी पाठवायला सुरुवात केली. क्रिकेट किट घेण्यासाठी त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते, पण मुलाची निराशा नको व्हायला म्हणून मित्राकडून पैसे उसने घेऊन त्यांनी ते किट त्याला घेऊन दिलं. प्रियमची कामगिरी... 1. रणजी सामन्यात खेळायला सुरुवात केल्यावर 2018-19 मध्ये प्रियमने 800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 2. गोवा संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक केलं होतं. 3. 2018-19 च्या रणजी सामन्यात 67.83 अव्हरेज ने 2 शतकं आणि 4 अर्ध शतकं करून सामन्यात रंगात आणली होती. 4. अंडर 19 च्या गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रियममुळे भारतीय संघाला अंतिम फेरीत गाठता आली. 5. आयपीएलच्या लिलावात गेल्या वर्षी सनरायझर्सने प्रियमला 1.9 कोटी रुपयांत विकत घेतलं होतं
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या