Home /News /sport /

श्रेयस-चहलचा भन्नाट ‘सेलिब्रेशन’ डान्स, VIDEO व्हायरल

श्रेयस-चहलचा भन्नाट ‘सेलिब्रेशन’ डान्स, VIDEO व्हायरल

या व्हिडिओमध्ये चहल आणि श्रेयस दोघं डान्स करताना दिसत आहेत.

  माउंट माउंगानुई,  3 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियानं चमकदार कामगिरी करत विजयोत्सव साजरा केला. यावेळी पुन्हा एकदा युजवेंद्र चहल आपल्या अंदाजात टीम इंडियासोबत सेलिब्रेशन करतना दिसला. क्रिकेटच्या मैदानात चहल सामन्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत धमाल करत असतो. असाच चहलचा मौज मस्ती करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  या व्हिडिओमध्ये चहलसोबत श्रेयसही असून दोघं डान्स करताना दिसत आहेत. चहल श्रेयस अय्यरसोबत डान्स स्टेप्स करत असातानाचा व्हिडिओ टीम इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. यावेळी ‘विक्ट्री डान्स’ असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. अखेरचा सामना जिंकल्यानंतर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. ‘टीम इंडियानं मोठा विजय मिळवला आहे म्हटल्यावर डान्स तर होणारच!’, अशा शब्दात फॅन्स या व्हिडिओवर कॉमेंट करत आहेत.
  View this post on Instagram

  Victory dance 🕺🕺

  A post shared by Team India (@indiancricketteam) on

  टीम इंडियाची दमदार कामगिरी  टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडवर मात केली. ही मालिका टीम इंडियानं 5-0नं खिशात घातली. 5 सामन्यांच्या मालिकेतील सर्वच सामने जिंकणारी टीम इंडिया विश्वातील एकमेव टीम असल्याचं सांगितलं जात आहे. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा 7 धावांनी विजय झाला. याआधीच्या दोन सामन्यात टीम इंडियानं सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका सर्वच क्रिकेट प्रेमींच्या कायम लक्षात राहणारी आहे.
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Cricket, Ind vs nz, Team india

  पुढील बातम्या