Home /News /sport /

IND vs SA: ...म्हणून रोहितच्या जागी Priyank Panchal ची टेस्ट सीरिजसाठी निवड

IND vs SA: ...म्हणून रोहितच्या जागी Priyank Panchal ची टेस्ट सीरिजसाठी निवड

Priyank Panchal

Priyank Panchal

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित शर्मा जायबंदी झाल्याने प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याची टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे.

  मुंबई, 14 डिसेंबर: दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला (India tour of South Africa) मोठा धक्का बसला आहे. दौऱ्यावर जायच्या आधी मुंबईमध्ये सराव करताना रोहित शर्माला दुखापत (Rohit Sharma Injured) झाली आहे. त्यामुळे टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माऐवजी टीममध्ये प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, क्रिकेट जगतात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. शर्माऐवजी प्रियांक पांचाळला का संधी दिली? या बॅट्समनमध्ये इतकं काय खास आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कारण, प्रियांकने टीम इंडियाकडून ना टी20 ना वनडे खेळली आहे. रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळची निवड करण्यामागे 5 ठोस कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, 31 वर्षांचा प्रियांक अनुभवी खेळाडू आहे.  तो नुकताच भारत-अ संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे त्याने ओपनिंग करताना 96 रन्सची इनिंग खेळली. दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्टी आणि वेगवान गोलंदाजांसमोर सलामी देताना 96 धावा करणे सोपे नाही. हे फक्त एक फलंदाजच करू शकतो जो तांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे आणि ज्याला आधीच आंतरराष्ट्रीय बॉलर्ससमोर खेळण्याचा अनुभव आहे. या दोन्ही पॅरामीटर्सवर प्रियांक एकदम फिट बसतो.

  प्रियांकाला आंतरराष्ट्रीय खेळण्याचा अनुभव अधिक

  प्रियांकची भारतीय कसोटी संघात निवड होण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे भारत-अ संघासोबतचा त्याचा दीर्घकाळ संबंध. दक्षिण आफ्रिकेपूर्वीही प्रियांकने भारत-अ संघासोबत अनेक देशांचे दौरे केले आहेत. यापूर्वी तो 2019 मध्ये भारत-अ संघासोबत वेस्ट इंडिजला गेला होता. तो त्याच वर्षी श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारत अ संघाकडून खेळला होता. प्रियांकने दोन्ही वेळी शानदार फलंदाजी केली. त्यानंतर श्रीलंका-अ विरुद्ध, प्रियांकने कसोटीत एकाच दिवसात 160 धावा केल्या होत्या. त्यावेळी श्रीलंका-अ संघात अकिला धनंजया आणि लक्ष संदाकनसारखे फिरकीपटूही होते. त्यावेळी अनुभवी फलंदाजांची चाली नाही. मात्र, त्याला तोंड देत प्रियांकने मोठी खेळी खेळली. त्यानंतर भारताने श्रीलंका-अ संघाचा 2-0 असा पराभव केला. याशिवाय प्रियांकने वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 अनौपचारिक कसोटीत भारत-अ च्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर पोर्ट ऑफ स्पेनमधील दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याने अर्धशतक केले. पहिल्या डावात त्याने 20 धावांत 5 गडी गमावल्यानंतर 58 धावा केल्या.

  प्रियांकची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बॅट तळपतीय

  गेल्या काही वर्षांपासून त्याचा दिलीप ट्रॉफीमध्ये आणि भारत-अ संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. प्रियांक पहिल्यांदा 2016-17 च्या रणजी ट्रॉफी हंगामात प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने गुजरातसाठी 1310 धावा केल्या होत्या. त्या वर्षी गुजरात चॅम्पियन झाला. त्यानंतर त्याला मलेरिया झाला होता. मात्र, लवकरात लवकर फिट होत त्याने भारतातील प्रथम श्रेणी सामन्यात इतर फलंदाजापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्याला पुन्हा भारत-अ संघात स्थान मिळवायचे होते आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग धावा करून त्याने संधी मिळवली. 2017-18 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये तो गुजरातचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 7 सामन्यात 542 धावा केल्या होत्या. 2018-19 मध्येही त्याने 9 सामन्यात 898 धावा केल्या होत्या.

  प्रियांकला द्रविडचे लाभले आहे मार्गदर्शन

  राहुल द्रविडने भारत-अ संघासोबत प्रशिक्षक म्हणून बराच वेळ घालवला आहे. 2015 ते 2019 पर्यंत तो या संघासोबत होता. त्यादरम्यान, प्रियांकदेखील बॅट्समन म्हणून संघात दाखल होता. त्यामुळे त्याच्या खेळीची कमाल द्रविडला माहिती आहे. स्वतः प्रियांकनेही याआधी सांगितले आहे की, मला द्रविडकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. पांचाळ म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा भारत-ए संघाचा कर्णधार झालो. मग द्रविड संघाच्या सराव सत्राला द्रविड आले होते. त्यावेळी त्यांनी मला इतकेच सांगितले की जास्त घाई करू नकोस. मला माहित आहे की तू कर्णधार आहेस आणि तुला संधी देण्यात आली आहे, परंतु एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक नाही. त्याच्या या मौलिक सल्ल्याने मला खूप दिलासा मिळाला होता. अशी भावनादेखील त्याने एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

  प्रियांकला 100 फर्स्ट क्लास मॅच खेळण्याचा अनुभव

  प्रियांकला 100 फर्स्ट क्लास मॅच खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्याने 24 शतके आणि 25 अर्धशतकांसह एकूण 7011 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 45.52 इतकी आहे. त्याचबरोबर तो मिडल क्लास बॉलिंगदेखीवल करतो. त्याने आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Rohit sharma, South africa, Team india

  पुढील बातम्या