• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर, आणखी एका महान क्रिकेटपटूला लागण

इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर, आणखी एका महान क्रिकेटपटूला लागण

इंग्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. जगातल्या महान स्पिनरपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नलाही (Shane Warne) कोरोनाची लागण झाली आहे.

 • Share this:
  लंडन, 2 ऑगस्ट : इंग्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. जगातल्या महान स्पिनरपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नलाही (Shane Warne) कोरोनाची लागण झाली आहे. शेन वॉर्न हा सध्या द हंड्रेड (The Hundred) या स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लंडन स्पिरीट्स (London Spirits) या टीमचा तो मुख्य प्रशिक्षक आहे. शेन वॉर्नशिवाय टीम प्रशासनातल्या आणखी एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता शेन वॉर्न आयसोलेशनमध्ये गेला आहे. लॉर्ड्सवर सदर्न ब्रेव्ह विरुद्ध स्पिरीट यांच्यातल्या सामन्याआधी रविवारी शेन वॉर्नची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली होती. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार वॉर्नची नंतर कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. याशिवाय आरटी-पीसीआर टेस्टच्या रिपोर्टची अजून वाट पाहिली जात आहे. स्पिरीट टीममधल्या आणखी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं वृत्त आहे. द हंड्रेड सुरू झाल्यानंतर कोरोना झालेला शेन वॉर्न दुसरा कोच आहे. याआधी ट्रेन्ट रॉकेट्सचा मुख्य प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर यांचीही मागच्या आठवड्याच्या शेवटी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. वॉर्नच्या स्पिरीट टीमचा तीनपैकी दोन मॅचमध्ये पराभव झाला, तर एका मॅचचा निकाल लागला नाही. स्पिरीट टीमचे सहाय्यक आणि नॉर्थम्पटनशायरचे मुख्य प्रशिक्षक डेव्हिड रिप्ले वॉर्नच्या अनुपस्थितीमध्ये मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडतील.
  Published by:Shreyas
  First published: