मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /23 सिक्सच्या मदतीने ठोकले 302 रन, T20 World Cup आधी समोर आला नवा सुपरस्टार!

23 सिक्सच्या मदतीने ठोकले 302 रन, T20 World Cup आधी समोर आला नवा सुपरस्टार!

T20 World Cup आधी इंग्लंडला दिलासा

T20 World Cup आधी इंग्लंडला दिलासा

इंग्लंडची टीम टेस्ट फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध (India vs England) संघर्ष करत आहे, पण टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) त्यांचा एक खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) द हंड्रेड (The Hundred) या स्पर्धेत धडाकेबाज बॅटिंग केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 19 ऑगस्ट : इंग्लंडची टीम टेस्ट फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध (India vs England) संघर्ष करत आहे, पण टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) त्यांचा एक खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) द हंड्रेड (The Hundred) या स्पर्धेत धडाकेबाज बॅटिंग केली आहे. लिव्हिंगस्टोनच्या या बॅटिंगच्या जोरावर बर्मिंघम फिनिक्सने फायनलमध्ये जागा मिळवली आहे. या स्पर्धेत लियाम लिव्हिंगस्टोन सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे.

लियाम लिव्हिंगस्टोनने द हंड्रेड स्पर्धेत 8 मॅच खेळून 60.40 च्या सरासरीने 302 रन केले, त्याचा स्ट्राईक रेटही 171.59 एवढा आहे. या स्पर्धेत त्याने 18 फोर आणि 23 सिक्स मारले. सिक्स मारणाऱ्यांमध्ये लिव्हिंगस्टोन इतर खेळाडूंपासून बराच पुढे आहे. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 12-12 सिक्स मारले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्सच्या मैदानात तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याच मैदानात लिव्हिंगस्टोनने फोर आणि सिक्सचा पाऊस पाडला. नॉर्दन सुपरचार्जर्सविरुद्ध त्याने 40 बॉलमध्ये नाबाद 92 रन ठोकले. या खेळीमध्ये त्याने 10 सिक्स आणि 3 फोर मारले. या वादळी खेळीच्या जोरावर लिव्हिंगस्टोनने आपल्या टीमला फायनलमध्ये पोहोचवलं.

रॉकेट्सविरुद्धही लिव्हिंगस्टोनने 31 बॉल खेळून 50 रन केले होते, त्यामुळे टीमचा 16 रनने विजय झाला होता. लिव्हिंगस्टोनचा हा फॉर्म इंग्लंडसाठी दिलासादायक आहे. 17 ऑक्टोबरपासून युएई-ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे.

द हंड्रेडनंतर लिव्हिंगस्टोन आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळताना दिसू शकतो. आयपीएलमध्ये त्याला अजूनही पदार्पणाची संधी मिळालेली नाही. लिव्हिंगस्टोनचा हा फॉर्म बघता राजस्थान त्याला खेळण्याची संधी देईल, हे निश्चित मानलं जात आहे.

First published:

Tags: Cricket, England, T20 world cup