लंडन, 29 जुलै : इंग्लंडमध्ये सध्या 'द हंड्रेड' (The Hundred) या क्रिकेटमधील संपूर्ण नव्या प्रकारातील स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सामन्यामध्ये एका इनिंगमध्ये 100 बॉलची मर्यादा आहे. पुरुष आणि महिला या दोन्ही गटात सध्या ही स्पर्धा सुरु आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) या स्पर्धेचं जोरदार प्रमोशन करण्यात येत आहे. यावेळी लंडन स्पिरीट (London Spirit) या टीमनं प्रमोशनसाठी वापरलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
लंडन स्पिरीट या टीमचे होम ग्राऊंड हे क्रिकेटचे माहेरघर समजले जाणारे द लॉर्डस (The Lords) आहे. या मैदानाला मोठा इतिहास असल्यानं क्रिकेट विश्वात याची मोठी प्रतिष्ठा आहे. या टीमनं फेसबुकवर केलेल्या प्रमोशनामध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरचा (Mohammad Amir) फोटो वापरला आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात 2010 साली लॉर्डस मैदानावर झालेल्या टेस्टमध्ये आमिर स्पॉट फिक्सिंग करताना सापडला. स्पॉट फिक्सिंगमधील त्याचा सहभाग सिद्ध झाला. त्यामुळे सलमान बट आणि मोहम्मद आसिफ या पाकिस्तान टीममधील सहकाऱ्यासह त्याच्यावर क्रिकेट खेळण्याची बंदी घातली होती. पाच वर्षांची बंदी संपवून आमिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत आला आहे.
आमिरनं मागच्या वर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी निवड न झाल्यानं आमीरनं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या रिटायरमेंटनंतरही बराच वाद झाला असून तो वाद अजूनही पूर्ण संपलेला नाही.
IND vs SL : आणखी 2 जण करणार पदार्पण, वाचा कशी असेल टीम इंडियाची Playing 11
लंडन स्पिरीट टीमचा कॅप्टन इऑन मॉर्गन असून शेन वॉर्न या टीमचा कोच आहे. मॉर्गनच्या फोटोचा वापर न करता क्रिकेटशी गद्दारी करणाऱ्या मोहम्मद आमिरचा फोटो या टीमनं झळकावल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England