मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहित, विराटच्या सहकाऱ्यांनी पटकावलं The Hundred स्पर्धेचं पहिलं विजेतेपद

रोहित, विराटच्या सहकाऱ्यांनी पटकावलं The Hundred स्पर्धेचं पहिलं विजेतेपद

इंग्लंडमधील 100 बॉल क्रिकेट स्पर्धेच्या (The Hundred) पहिल्या सिझनमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) सहकाऱ्यांनी बाजी मारली आहे.

  • Published by:  News18 Desk

लॉर्ड्स, 22 ऑगस्ट : इंग्लंडमधील 100 बॉल क्रिकेट स्पर्धेच्या (The Hundred) पहिल्या सिझनमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) सहकाऱ्यांनी बाजी मारली आहे. शनिवारी रात्री लॉर्ड्सवर झालेल्या पुरुषांच्या फायनलमध्ये (Men's Final) साऊदर्न ब्रेव्हनं (Southern Brave) बर्मिंगहम फोनिक्स (Birmingham Phoenix) टीमचा 32 रननं पराभव करत विजेतेपद पटकावले.

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) क्विंटन डी कॉक आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) टीम डेव्हिड हे साऊदर्न ब्रेव्ह टीमचे सदस्य होते. तर महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सहकारी मोईन अली (Moeen Ali) बर्मिंगहॅम टीमचा कॅप्टन होता.

ब्रेव्हनं पहिल्यांदा बॅटींग करताना 100 बॉलमध्ये 5 आऊट 161 रन केले. ओपनिंग बॅट्समन पॉल स्टर्लिंगनं सर्वात जास्त 61 रन काढले. डी कॉकला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो 7 बॉलमध्ये 7 रन काढून आऊट झाला. विराटचा नवा सहकारी टीम डेव्हिडनं 6 बॉलमध्ये 250 च्या स्ट्राईक रेटनं 15 रन काढले. बर्मिंहगमकडून कॅप्टन मोईन अलीला एकही विकेट मिळाली नाही.तर त्याचा सीएसकेमधील सहकारी इम्रान ताहीरला फक्त 1 विकेट मिळाली.

IPL आणि T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का? कोचनं दिलं अपडेट

बर्मिंगहमला विजयासाठी 169 रनचे लक्ष्य होते. त्यांना 100 बॉलमध्ये 5 आऊट 136 रनपर्यंतच मजल मारता आली. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या लियम लिविंग्स्टोननं 19 बॉलमध्ये 46 रनची आक्रमक खेळी केली. त्यानंतर त्याच्या टीमला वेगानं रन जमवता आले नाहीत. मोईन अलीनं 30 बॉलमध्ये 36 रन काढले. आरसीबीच्या टीम डेव्हिडनं फिल्डिंगमध्ये कमाल करत एक कॅच पकडला तसंच एकाला रन आऊट केले.

First published:

Tags: Cricket news