मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

माझा आक्रमक स्वभाव तेव्हा बदलेल जेव्हा...; मॅचनंतर Virat Kohliने स्पष्ट केली भूमिका

माझा आक्रमक स्वभाव तेव्हा बदलेल जेव्हा...; मॅचनंतर Virat Kohliने स्पष्ट केली भूमिका

Virat Kohli

Virat Kohli

नामिबियाविरुद्ध झालेल्या मॅचनंतर विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या आक्रमक स्वभावाविषयी विचारण्यात आले. त्यावर त्याने हटके उत्तर दिले.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: टीम इंडियाने (Team India) सोमवारी 8 नोव्हेंबर 2021ला औपचारिकता म्हणून स्पर्धेतील आपली अखेरची मॅच खेळली. नामिबियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. ही मॅच भारतासाठी आणि विशेषत: विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास होती. विराट कोहली कॅप्टन म्हणून शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळत होता. मॅचनंतर विराटला अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. यामध्ये त्याच्या आक्रमक स्वभावाविषयीदेखील(aggression) विचारण्यात आले. त्यावर त्याने हटके उत्तर दिले.

मॅचनंतर पत्रकार परिषेद घेण्यात आली. यावेळी 33 वर्षीय विराटला कर्णधारपद सोडल्याने त्याच्या आक्रमक स्वभावावर परिणाम होईल का, असे विचारले असता तो म्हणाला, 'नाही, ही शैली कधीच बदलणार नाही. कदाचीत, हे तेव्हा बदलू शकते जेव्हा मी क्रिकेट खेळणे बंद करेन. अशी स्पष्ट भूमिका विराटने यावेळी व्यक्त केली.

तसेच, टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने स्वत: आणि टीम इंडियाबद्दल जाहीरपणे अनेक खुलासे केले. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट, 'आता मला खूप आराम वाटत आहे. गेल्या 6 ते 7 वर्षात मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरलो तेव्हा मी कठोर क्रिकेट खेळलो, ज्याचा शरीरावर खूप परिणाम होतो. टी-20 क्रिकेटमध्ये फारसा फरक पडणार नाही. जर तुम्ही पहिल्या दोन सामन्यांमध्ये पहिल्या दोन षटकांमध्ये अधिक उत्कटतेने खेळला असता तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. असे मत विराटने यावेळी व्यक्त केले.

यासोबतच त्याने टीम इंडियाच्या निराशजनक कामगिरीवर भाष्य केले. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सुरुवातीची दोन षटके चांगली राहिली असती तर गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडू शकल्या असत्या. या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला अपयशामागे न्यूझीलंड आणि पाकिस्तान हेच ​​सर्वात मोठे कारण ठरले. मी म्हटल्याप्रमाणे आम्ही पुरेसे धैर्य दाखवले नाही. आमचा संघ टॉस दोषी ठरवणारा नसल्याचे विराटने यावेळी म्हटले आहे.

First published:

Tags: T20 league, Virat kohli