Home /News /sport /

KL Rahul साठी 'संकटमोचक' ठरला होता बालपणीचा मित्र, जाणून घ्या काय आहे किस्सा?

KL Rahul साठी 'संकटमोचक' ठरला होता बालपणीचा मित्र, जाणून घ्या काय आहे किस्सा?

KL Rahul

KL Rahul

लोकेश राहुलने केलेल्या दमदार शतकाच्या (KL Rahul) जोरावर आणि वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला.

    नवी दिल्ली, 2 जानेवारी: लोकेश राहुलने केलेल्या दमदार शतकाच्या (KL Rahul Test century) जोरावर आणि वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा (IND vs SA) पहिला कसोटी सामना जिंकला. राहुलने सामन्याच्या पहिल्याच दिवशी दमदार शतक ठोकलं. इतर फलंदाजांना फलंदाजी करणं कठीण वाटत असताना राहुलने मात्र संयमी खेळी करत शतक झळकावलं. त्याच्या या शतकी खेळाची चर्चा रंगली असताना एक किस्सा समोर आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. 2 वर्षांपूर्वी खराब कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते, मात्र आज तो एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि कसोटीत उपकर्णधार बनला आहे. अखेर केएल राहुलची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर कशी आली याचा खुलासा झाला आहे. केएल राहुलची घसरलेली गाडी पुन्ह रुळावर आणण्यात त्याचा बालपणीचा मित्र डेविड मथायसची (David Mathias) भूमिका महत्त्वाची ठरली. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मथायसने राहुलला जेव्हा संघातून वगळण्यात आले होते तेव्हाच एक किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितले की एके दिवशी राहुलचा फोन आला की आपण आज रात्री जेवायला भेटू का? फोनवर बोलत असताना मथियासला जाणवले की तो थोडा निराश होता. हा किस्सा 2019 मधील आहे. जेव्हा केएल राहुलला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. यामुळे त्याला खूप वाईट आणि नकारात्मक वाटू लागले होते. दोघांचीही भेट झाली. त्यानंतर केएल राहुल आणि मॅथियास यांनी बंगळुरू विमानतळाजवळील मैदानावर सराव करण्याचा निर्णय घेतला. इथे त्याचा आणखी एक मित्र त्याची क्रिकेट अकादमी चालवत असे. दुसऱ्या दिवसापासून राहुल आणि मित्र मॅथियासने त्या अकादमीत प्रशिक्षण सुरू केले. सुमारे दोन आठवडे दोघेही रोज सकाळी अकादमीत पोहोचायचे आणि तासन्तास नेटवर सराव करायचे. मॅथियासला राहुलच्या फलंदाजीची समस्या लक्षात यायला वेळ लागला नाही. 2018 मध्ये, इंग्लंडमध्ये, राहुल समोरच्या पॅडभोवती शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करत क्रीझमध्ये उभा होता. या कारणास्तव, त्याला त्याच्या ऑफ-स्टंपमध्ये येणारे चेंडू समजण्यास त्रास होत होता. एवढेच नाही तर त्याची बॅट बॉलवर अधिक जोरात येत होती. केएल राहुलची ही चूक मित्राने लगेच पकडली. मॅथियासने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मला दिसले की त्याला काही शॉट्स खेळताना अडचण येत होती. त्याची नेमकी काय चुक हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे जेव्हा चेंडू आतील बाजूस येतो, तेव्हा पॅड आणि बॅटमध्ये मोठे अंतर असते आणि त्याचा फायदा जागतिक दर्जाचे गोलंदाज सहज घेऊ शकतात आणि इंग्लंडमध्ये राहुलच्या बाबतीत असेच घडले. मला त्याच्या फलंदाजीत काय वाटले हे त्याला सांगितले. मी त्याला आणखी 10 निरुपयोगी गोष्टी सांगितल्या असाव्यात. पण एक गोष्ट बरोबर झाली. तेव्हा त्याच्या फलंदाजीत एवढा मोठा फरक पडेल हे मला माहीतही नव्हते. मॅथियास पुढे म्हणाले, “जसे दिवस सरावात जात होते. केएल राहुल त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ लागला. तेव्हा अकादमीत इतर कोणी खेळाडू नव्हते आणि प्रशिक्षक तोच होता ज्यांच्यासोबत आपण सर्वांनी लहानपणापासून काम केले आहे. केएल राहुलच्या फलंदाजीला न्याय देणारे कोणी नव्हते. त्यामुळेच तो कोणतीही चिंता न करता तासन्तास सराव करत राहिला. यादरम्यान, आम्ही त्याच्या फलंदाजीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि नंतर त्याची जुन्या व्हिडिओशी तुलना केली, त्यानंतर चित्र स्पष्ट झाले.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Kl rahul

    पुढील बातम्या