Elec-widget

The Ashes : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा कहर! 71 वर्षांनंतर इंग्लंडनं केली लाजिरवाणी कामगिरी

The Ashes : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा कहर! 71 वर्षांनंतर इंग्लंडनं केली लाजिरवाणी कामगिरी

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी केवळ 27.5 ओव्हरपर्यंतच खेळी केली.

  • Share this:

लीड्स, 23 ऑगस्ट : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ 179 धावांवर बाद झाला. दरम्यान इंग्लंडकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या वादळापूढे इंग्लंडचे फलंदाज केवळ 67 धावा करू शकले. तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी केवळ 27.5 ओव्हरपर्यंतच खेळी केली. इंग्लंडच्या केवळ एका फलंदाजाला 10चा आकडा गाठता आला. यामुळं ऑस्ट्रेलियाला 112 धावांची आघाडी मिळाली आहे.

जॉश हेजलवूडचा कहर

इंग्लंडच्या फलंदाजांना सर्वात जास्त त्रास दिला तो, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जॉश हेजलवूडनं. हेजलवूडनं केवळ 30 धावा देत 50 विकेट घेतल्या. हेजलवूडनं आपल्या करिअरमध्ये सातव्यांदा अशी कामगिरी केली आहे. त्याशिवाय जलद गोलंदाज पॅट कमिन्सनं 3 तर, जॅम्स पॅटिंसनं 2 विकेट घेतल्या.

वाचा-टीम इंडियातील खेळाडूनं धोनीला सुनावले खडेबोल, आता घेतला यू-टर्न!

इंग्लंडकडून एका फलंदाजांना पार केला 10चा आकडा

इंग्लंडकडून सर्वात जास्त धावा जो डेनलीनं केल्या. डेनलीनं 12 धावा केल्या, त्याशिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. रॉय 9 धावा करत बाद झाला. इंग्लंडचा खेळ 27.5 ओव्हरमध्येच संपला.

वाचा-फक्त धोनीची नाही तर पंत घेणार 'या' फलंदाजाची सुध्दा जागा, सेहगानं केला खुलासा

71 वर्षांनी केली लाजीरवाणी कामगिरी

इंग्लंडनं 67 धावांची निराशाजनक कामगिरी तब्बल 71 वर्षांनी केली आहे. याआधी 1948मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात इंग्लंडनं कमी धावा केल्या होत्या. 2019मध्ये इंग्लंडनं खुप वाईट खेळी केली. तीन वेळा या संघानं 100हून कमी धावा केल्या. इंग्लंडनं वेस्ट इंडिज विरोधात 77, आर्यलॅंड विरोधात 85 तर आता ऑस्ट्रेलिया विरोधात केवळ 67 धावा केल्या.

वाचा-फक्त 13 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला 'हा' खेळाडू झाला टीम इंडियाचा बॅटिंग कोच!

श्रावणात कसा पाडला पहिला कृत्रिम पाऊस, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...