अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजानं तोडला तब्बल 143 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!

अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजानं तोडला तब्बल 143 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!

अ‍ॅशेस मालिकेत जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ जखमी झाल्यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला.

  • Share this:

लंडन, 19 ऑगस्ट : अ‍ॅशेस मालिकेत जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ जखमी झाल्यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. दरम्यान आयसीसीनं नवा नियम लागू केल्यानंतर पहिल्यांदाच बदली (रिप्लेसमेंट) फलंदाज मैदानात आला. दरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात लाबुशेननं अर्धशतकी खेळी केली. ही खेळी करताच लाबुशेननं तबब्ल 143 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

स्मिथ जखमी झाल्यानंतर मैदानाबाहेर गेला, त्यानंतर लाबुशेननं बदली खेळाडू म्हणून खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान आर्चरचा पहिलाच चेंडू त्याच्या डोक्याला लागला, पण यातून सावरत लाबुशेननं फलंदाजी करण्यात सुरुवात केली. त्यामुळं आपल्या अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर लाबुशेननं एक वेगळा इतिहास रचला आहे. लाबुशेन पहिला खेळाडू बनला आहे, जो बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरला आणि अर्धशतकी कामगिरी केली.

1877मध्ये घडला होता असा प्रकार

अ‍ॅशेस मालिकेआधी 1877मध्ये असा प्रकार घडला होता. जेव्हा बदली फिल्डरच्या रूपात बिली मर्डोकने लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात कॅच घेतला होता. तर, 2005मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी ब्रॅड हॉगनं केली होती. त्यानंतर अॅशेस मालिकेत लाबुशेननं तब्बल 143 वर्षानंतर ही कामगिरी केली.

वाचा-स्मिथच्या धक्कादायक अपघातानंतर बदलणार क्रिकेटमधला सर्वात मोठा नियम!

स्टेम गार्ड्सचा होणार वापर

ह्जूजच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मानेच्या सुरक्षेसाठी स्टेम गार्ड वापरण्यात आला. मात्र त्याची सक्ती करण्यात न आल्यामुळं अशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथ हेड गार्ड न वापरता मैदानात उतरला. त्यामुळं आता स्टेम गार्डचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे विज्ञान खेळ आणि चिकित्सा प्रमुख अलेक्स कोंटोरिस एक वर्ष याचा वापर करून पाहणार आहे. त्यानंतर या हेल्मेटची सक्ती करण्यात येईल. आयसीसीही याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकतो.

वाचा-जोफ्रा आर्चर म्हणजे फलंदाजांचा कर्दनकाळ! आतापर्यंत 7 फलंदाजांना केले जखमी

तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार स्मिथ

स्मिथला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळं तो, तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार की नाही याबाबत साशंकता आहे. गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. स्मिथ वर्ल्ड कपपासून फॉर्ममध्ये आहे. त्यानं पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी केली होती.

वाचा-इशांत शर्माची तुफानी गोलंदाजी, स्वस्तात आटपला वेस्ट इंडिजचा डाव

मद्यधुंद तरुणाच्या कारनं 7 जणांना उडवलं, भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading