जोफ्रा आर्चर म्हणजे फलंदाजांचा कर्दनकाळ! आतापर्यंत 7 फलंदाजांना केले जखमी

इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरनं सध्या क्रिकेट जगतात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 10:27 AM IST

जोफ्रा आर्चर म्हणजे फलंदाजांचा कर्दनकाळ! आतापर्यंत 7 फलंदाजांना केले जखमी

इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरनं सध्या क्रिकेट जगतात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्याच्या गतीमुळं फलंदाजांची घाबरगुंडी उडाली आहे.

टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली गतीच्या जोरावर फलंदाजांना उध्वस्त केल्यानंतर जोफ्रा आता कसोटी क्रिकेटमध्ये आपला दम दाखवत आहे. मात्र त्याची गोलंदाजी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

इंग्लंड क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या दुसऱ्या सामन्यात जोफ्रा आर्चरला संधी देण्यात आली. यावेळी फॉर्ममध्ये असलेला स्मिथ 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला. तेव्हा तो मैदानावरच कोसळला. बराच काळ स्मिथ बेशुध्द अवस्थेत होता. त्यामुळं स्मिथ रिटायर्ड हर्ट झाला.

दरम्यान आर्चरच्या गोलंदाजीनं अशी परिस्थिती झालेला स्मिथ पहिला फलंदाज नव्हे, याआधी आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्ये आर्चरनं अनेक फलंदाजांची अशी अवस्था केली आहे.

दरम्यान स्मिथला पर्याय म्हणून आलेला मार्नस लाबुशेन पहिल्या चेंडूवर आर्चरचा शिकार झाला. पहिलाच चेंडू त्याच्या तोंडावर आदळला. त्यानंतर लाबूशेनला लगेचच फिजिओची मदत घ्यावी लागली.

Loading...

याआधी आयपीएलमध्ये राजस्थानक़डून खेळणाऱ्या जोफ्रा आर्चरनं चेन्नई सुपरकिंग्ज विरोधात झालेल्या सामन्यात आर्चरनं धोनीला आपलं शिकार केलं. धोनीच्या हेल्मेटला चेंडू लागल्यामुळं तो थोडक्यात बचावला.

वर्ल्ड कपमध्य दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या सामन्यातही असाच प्रकार घडला. आर्चरच्या गोलंदाजीनं हाशिम अमलाच्या डोक्याला चेंडू लागला. त्यामुळं त्याला सामन सोडून मैदानाबाहेर जावे लागले.

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यात एलेक्स कॅरीसोबतही असाच भयंकर प्रकार घडला. अलेक्स कॅरीच्या हनुवटीला चेंडू लागल्यानं भयंकर रक्तस्राव होत होता. मात्र अशा परिस्थितही कॅरीनं सामना खेळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2019 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...