The Ashes : ऑस्ट्रेलियाचा दणक्यात कमबॅक, इंग्लंडला घरच्या मैदानावर 251 धावांनी नमवलं!

स्टिव्ह स्मिथ-मॅथ्यू वेड यांची शतकी भागिदारी आणि गोलंदाजांचा भेदक माऱ्यानं इंग्लंडला उध्वस्त केले

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 08:03 PM IST

The Ashes : ऑस्ट्रेलियाचा दणक्यात कमबॅक, इंग्लंडला घरच्या मैदानावर 251 धावांनी नमवलं!

बर्मिंगहॅम, 05 ऑगस्ट : क्रिकेट जगतात सर्वा प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं यजमानांना 251 धावांनी नमवलं. हा इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव मानला जाऊ शकतो. स्टिव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला 398 धावांचे बलाढ्या आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला केवळ धावांपर्यंत मजल मारता आली.

पहिल्या डावात शतक लगावणारा रॉरी बर्न्स 31 चेंडूत केवळ 11 धावा करत बाद झाला. यानंतर 22व्या ओव्हरमध्ये जेसन रॉय मोठा शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. रॉय केवळ 28 धावा करत बाद झाला. त्यानंतर इंग्लंडला सर्वात मोठा झटका बसला तो कर्णधार जो रूटच्या विकेटनंर. कर्णधार रूट 28 धावा करत बाद झाला. त्यानंतर एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या 18 वर्षात इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका जिंकलेली नाही. त्यामुळं यजमानांना नमवत पाच मालिकांच्या या कसोटीत 1-0नं विजयी सुरुवात केली आहे.

वाचा-The Ashes : पंचांनी केली खराब अम्पायरिंग, चाहत्यांनी थेट केलं अंध!

ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायननं तब्बल सहा विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्सनं चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या या दोन गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्यामुळं क्रिस वोक्स वगळता कोणत्याही खेळाडूला मैदानात तग धरून उभे राहता आले नाही.

वाचा-पदार्पणातच नवदीप सैनीला जल्लोष पडला महागात, आयसीसीनं केली कारवाई!

स्मिथनं मारली बाजी

दरम्यान, पहिल्या डावात 8 बाद 122 धावांवरून स्मिथनं ऑस्ट्रेलियाला 284 धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या डावात स्मिथनं 219 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकार खेचून 144 धावा केल्या. दुसऱ्या डावातही स्मिथची धावांची भूक कायम दिसली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 90 धावांची आघाडीचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज 75 धावांत तंबूत परतले होते. त्यानंतर स्मिथ आणि टॅ्व्हीस हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यानंतर स्मिथनं मॅथ्यू वेड सह 126 धावांची भागीदारी केली. स्मिथनं 207 चेंडूंत 14 चौकारांच्या मदतीनं 142 धावा केल्या. स्मिथनंतर वेडनं 143 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीनं 110 धावांची खेळी केली.

वाचा- तारीख ठरली! वेस्ट इंडिज दौऱ्यातच टीम इंडियाला मिळणार नवा कोच

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 07:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...