The Ashes : पंचांनी केली खराब अम्पायरिंग, चाहत्यांनी थेट केलं अंध!

The Ashes : पंचांनी केली खराब अम्पायरिंग, चाहत्यांनी थेट केलं अंध!

अ‍ॅशेस मालिकेत विल्सन आणि अलीम दार यांनी पहिल्या सामन्यात 12 चूकीचे निर्णय घेतले.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 05 ऑगस्ट : पाच कसोटी सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच सामन्यात खराब अम्पायरिंग पाहायला मिळाली. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याच होत असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचे पंच जोअल विल्सननं काही खराब निर्णय दिले, ज्यावर चाहते चांगलेच भडकले आहेत. त्यामुळं चाहत्यांनी याचा राग काढत या पंचांना थेट अंध केलं.

पहिल्या कसोटी सामन्यात या पंचांनी एक नाही दोन नाही तर डजनभर चूका केल्या. त्यामुळं संतापलेल्या चाहत्यांनी विल्सन यांच्या विकीपीडिया पेजमध्ये छेडछाड केली. विल्सन आणि अलीम दार यांनी पहिल्या सामन्यात 12 चूकीचे निर्णय घेतले. त्यामुळं चाहत्यांनी विल्सन यांच्यात विकीपीडियात 'अंध आंतरराष्ट्रीय पंच', असे लिहिले.

अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यात विल्सन यांना आपले अनेक निर्णय हे DRSमुळं बदलावे लागले. या सामन्यात पाकिस्तानी पंच अलीम दार यांच्याकडूनही अनेक चूका झाल्या. पंच विल्सन यांच्या विकीपीडिया पेजमध्ये छेडछाड करत "जोअल शेल्डन विल्सन (जन्म 30 डिसेंबर 1966) त्रिनिदाद आणि टोबागोचे एक आंतरराष्ट्रीय अंध पंच आहेत.

वाचा-Ashes : 16 व्या वर्षी केली होती कॅन्सरवर मात, आता चेंडू दिसत नसताना झळकावलं शतक

वाचा- पदार्पणातच नवदीप सैनीला जल्लोष पडला महागात, आयसीसीनं केली कारवाई!

विल्सन आयसीसीच्या पॅनलमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय टी-20, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात अम्पायरिंग केले आहे". दरम्यान हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर ही माहिती डिलीट करण्यात आली. विकीपीडियावरून अंध हा शब्द काढून टाकण्यात आला.

दरम्यान स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं इंग्लंडसमोर 398 धावांचे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या 18 वर्षात इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका जिंकलेली नाही. त्यामुळं यजमानांना नमवण्यासाठी पहिल्या विजयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज आहे.

वाचा-शेवटच्या सामन्यात पंतला डच्चू तर ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी, कोहलीनं दिले संकेत!

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 07:01 PM IST

ताज्या बातम्या