The Ashes : ऑस्ट्रेलिया पाठोपाठ अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'या' चॅम्पियन खेळाडूची बढती

The Ashes : ऑस्ट्रेलिया पाठोपाठ अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'या' चॅम्पियन खेळाडूची बढती

1882 पासून 2018 पर्यंत दोन्ही संघांन एकूण 330 सामने खेळले आहेत. या ऐतिहासिक स्पर्धेसाठी दोन्ही संघांनी टीम जाहीर केली आहे.

  • Share this:

लंडन, 27 जुलै : वर्ल्ड कप स्पर्धेत चॅम्पियन ठरलेल्या इंग्लंड संघानं आयर्लंडला हरवत अ‍ॅशेससाठी शुभारंभ केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड होणाऱ्या पारंपरिक अशा अ‍ॅशेस मालिकेची सुरुवात 1 ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी दोन्ही संघांनी आपल्या संभाव्य खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यात इंग्लंडला वर्ल्ड कपला जिंकून देणाऱ्या चॅम्पियन खेळाडूला बढती मिळाली आहे.

ऐतिहासिक असलेल्या अ‍ॅशेस मालिकेला एक खास महत्त्व आहे. 1882 पासून 2018 पर्यंत दोन्ही संघांन एकूण 330 सामने खेळले आहेत. यात इंग्लंडनं 106 तर, ऑस्ट्रेलियानं 134 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांसाठी ही लढाई सन्मानाची असणार आहे. त्यामुळं दोन्ही संघांनी आपले संघ निवडताना फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना संधी दिली आहे.

वर्ल्ड कपमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान देण्यात आले आहे. जोफ्रानं वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. 24 वर्षीय जोफ्रानं 28 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 131 विकेट घेतल्या आहेत. तसेच, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.

असा आहे इंग्लंडचा संघ -

जो रूट ( कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ऑली स्टोनस ख्रिस वोक्स.

वाचा-अमेरिकेनं नाकारला शमीचा व्हिसा, BCCIनं उचललं 'हे' पाऊल

ऑस्ट्रेलियानं दिली वॉर्नर आणि स्मिथला संधी

वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या वॉर्नर आणि स्मिथला अ‍ॅशेस संघात स्थान दिले आहे. चेंडू कुडतरल्यानंतर या दोन्ही संघांवर बंदी घालण्याता आली होती. त्यामुळं या सगळ्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही खेळाडू कसोटी सामना खेळणार आहेत. अ‍ॅशेस मालिकेच्या आधी झालेल्या सराव सामन्यात वॉर्नरनं अर्धशतकी खेळी केली होती.

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ

टिम पेन (कर्णधार), कॅमरन बॅनक्रॉफ्ट, पॅट कमिन्स, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविड हेड, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, मिचेल मार्श, माइकल नेसर, जेम्स पॅटिनसन, पीटर सीडल, स्टिव स्मिथ, मिचेल स्टार्क, मैथ्यू वेड आणि डेव्हिड वॉर्नर

अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी - 1 ते 5 ऑगस्ट, एडबॅस्टन, बर्मिंगहॅम

दुसरी कसोटी - 14 ते 18 ऑगस्ट, लॉर्ड्स, लंडन

तिसरी कसोटी - 22 ते 26 ऑगस्ट, हेडिंग्ली, लीड्स

चौथी कसोटी - 4 ते 8 सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी - 12 ते 16 सप्टेंबर, ओव्हल, लंडन

वाचा-अनुष्का शर्माचा हिटमॅनवर पलटवार, रोहित-विराट वाद चिघळला!

VIDEO: मुसळधार पावसामुळे डोंबिवली, दिवा परिसरात कंबरेएवढं पाणी

First published: July 27, 2019, 6:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading