लीड्स, 25 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडनं आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला. यात बेन स्टोकची नाबाद 135 खेळी महत्त्वाची ठरली. या चॅम्पियन खेळाडूनं अगदी अटीतटीच्या अशा सामन्या इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडनं केवळ विकेटनं हा सामना जिंकला. पहिला डाव केवळ 67 धावांवर संपुष्टात आल्यानंतर टिकेचे धनी ठरलेल्या इंग्लंडनं दमदार कमबॅक केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे.
अशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटच्या 77 धावांच्या खेळीमुळं इंग्लंडचा डाव सावरला. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 67 धावांत गुंडाळल्यानंतर तिसऱ्या दिवशीच विजय मिळवण्याच्या इराद्यानं ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला होता. मात्र इंग्लंडने तिसऱ्या दिवस अखेर तीन बाद 156 धावा करत त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवले.
The best 1* you'll ever see.#Ashes pic.twitter.com/xBoTvV2VXi
— ICC (@ICC) August 25, 2019
वाचा-भारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी! कमाई वाचून व्हाल थक्क
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 179 धावा केल्या. तर तब्बल 71 वर्षांनी इंग्लडा लाजीरवाणा अशा केवळ 67 धावा करता आल्या. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या सलामीवीरांना ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांनी स्वस्तात माघारी पाठवले. त्यामुळं इंग्लंडची 15-2 अशी परिस्थिती आली होती. त्यानंतर कर्णधार रूटनं जो डेनलीसोबत महत्त्वपूर्ण अशी 126 धावांची भागिदारी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं जवळजवळ आपला विजय निश्चित केला होता. मात्र त्यानंतर जॉनी बेअरस्टो 36 धावा करत बाद झाला. तर, जॉस बटलर, ख्रिस वोक्स केवळ एक धाव करत बाद झाले. त्यामुळं बेन स्टोकनं पुन्हा फलंदाजीची धुरा सांभाळत 219 चेंडूत 135 धावांची खेळी केली.
Ben Stokes is having quite a good summer, isn't he?#Ashes pic.twitter.com/wbIHjOW9rO
— ICC (@ICC) August 25, 2019
वाचा-इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं पुन्हा केली 'NUDE' फलंदाजी, फोटो व्हायरल
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र बेन स्टोकनं ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवल्या.
वाचा-केएलनं घेतली मयंक अग्रवालची विकेट, या अनोख्या ‘पराक्रमा’चा व्हिडिओ एकदा पाहाच!
VIDEO: मुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा