क्रिकेटपटूनं एका वर्षात कमवले 2 अब्ज 21 कोटी, 'हा' आहे फंडा!

क्रिकेटपटूनं एका वर्षात कमवले 2 अब्ज 21 कोटी, 'हा' आहे फंडा!

अॅशेस मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या या खेळाडूची कमाई वाचून व्हाल थक्क.

  • Share this:

लंडन, 14 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं विराट कोहलीली मागे टाकण्यासाठी त्याला केवळ काही धावांची गरज आहे. दरम्यान बॉल टेम्परिंगमुळं जवळ जवळ एका वर्षांची बंदी मिळालेल्या स्टिव्हनं जबरदस्त कमबॅक केला. वर्ल्ड कप 2019मध्ये चार अर्धशतकांच्या मदतीनं सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 13व्या क्रमांकावर होता. तर, सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करत दोन डावांत दोन शतक करत इतिहास रचला.

मैदानावर अनेक किर्तीमान पराक्रम करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ मैदानाबाहेरही आपल्या कमाईमुळं चांगलाच चर्चेत आला आहे. व्यवसाय, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि आयपीएल यातून स्मिथ खौऱ्यानं पैसे कमवतो. ऑस्ट्रेलियन फायन्साशियल या मासिकेनं दिलेल्या माहितीनुसार स्मिथची एकूण कमाई तब्बर 2 अब्ज 21 कोटी 6 लाख रूपये आहे. हे आकडे पाहता, तो सर्वात श्रीमंत क्रिकेटर बनला आहे. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये नाही तर, कमाईत स्मिथनं विराटला मागे टाकले आहे.

दरम्यान, स्मिथनं एक मॅट्रेस (गाद्या) तयार करणाऱ्या कोआला (Koala) या कंपनीत 71 लाख 30 हजार गुंतवले होते. या कंपनीतून स्मिथला तब्बल 85 कोटी 60 लाखांचा फायदा झाला आहे. स्मिथनं ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेटचा कर्णधार होण्याआधी या कंपनीत गुंतवणूक केली होती. आता या कंपनीची व्हॅल्यू 10 अब्ज 70 कोटी 28 लाख 75 हजार झाली आहे.

आयपीएल आणि ऑस्ट्रेलियन बोर्डकडून स्मिथ कमवतो 29 कोटी

या कंपनी व्यतिरिक्त स्मिथनं ऑस्ट्रेलियन बोर्डाशी केलेल्या करारानुसार त्याला 14 कोटी 26 लाख रूपये मिळतात. तर, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या स्मिथला जवळजवळ 14 कोटी मिळतात. त्यामुळं, ऑक्टोंबरमध्ये जारी केल्या जाणाऱ्या सर्वात युवा श्रीमंतांच्या यादीत स्मिथची नोंद होऊ शकते.

एका चूकीमुळं 50 कोटींचे झाले होते नुकसान

बॉल टेम्पिरिंग प्रकरणानंतर स्मिथला जवळ जवळ 50 कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. हे नुकसान वर्षभर क्रिकेट न खेळल्यामुळं आणि जाहिरातींमध्ये संधी न मिळाल्यामुळं झाले होते.

पूरग्रस्त भागात दुधामध्ये मिसळतंय नदीचे पाणी? VIRAL VIDEOचं हे आहे सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या