The Ashes : आर्चरची शाळा घेणाऱ्या शोएब अख्तरला युवराजनं दाखवली जागा!

The Ashes : आर्चरची शाळा घेणाऱ्या शोएब अख्तरला युवराजनं दाखवली जागा!

माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरनं स्मिथच्या अपघातानंतर जोफ्रा आर्चरवर टीका केली होती.

  • Share this:

लंडन, 19 ऑगस्ट : अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळं स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावं लागलं. दरम्यान स्मिथ जेव्हा मैदानावर कोसळला तेव्हा जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर हसत होते. यावरून चाहत्यांनी जोफ्रा आर्चरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरनं आर्चरवर ट्विटवरून टीका केली. पण भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने शोएब अख्तरलाच ट्रोल केले.

शोएबनं आर्चरची शाळा घेत, “जोफ्रा आर्चरकडे शिष्टाचार नाही. आपण टाकलेल्या बाऊन्सरमुळे खेळपट्टीवरच कोसळलेल्या स्मिथची चौकशी करायलाही आर्चर सरसावला नाही”, अशी टीका ट्विटरवरून केली. तसेच, “बाऊन्सर हा खेळाचा बाग आहे. पण जेव्हा आपल्या चेंडूच्या आघातानं फलंदाज दुखावतो किंवा खेळपट्टीवर कोसळतो तेव्हा त्याची चौकशी करणे, त्याला सावरणे तसेच त्याच्या दुखापतीविषयी जाणून घ्यायचे असते. माझ्या चेंडूमुळं दुखावलेल्या फलंदाजांना सावरण्यासाठी मी नेहमीच प्रथम धाव घेतली आहे”, असे सांगितले.

मात्र शोएब अख्तरच्या या ट्वीटनंतर युवराज सिंगनं त्याला ट्रोल करत, “हा तुम्ही असं करत होतात, पण फलंदाजाला तुम्हा अजून असे काही चेंडू येतील असे सांगायचा”, असे मिश्किल ट्वीट केले.

जोफ्रा आर्चरनं दिले टीकाकारांना उत्तर

स्मिथ जखमी झाल्यानंतर आर्चरनं त्याची विचारपूस केली नाही. दरम्यान आर्चरनं अखेर या सगळ्या प्रकरणावर त्यानं उत्तर दिले आहे. आर्चरनं, “मी कधीच खेळाडूंना दुखापत होईल याचा विचार करून गोलंदाजी केली नाही. पहिले तुम्ही त्यांची विकेट घेण्याचा प्रयत्न करतात. मी जेव्हा स्मिथला खाली कोसळताना पाहिले तेव्हा माझा श्वास थांबला होता. गोलंदाज म्हणून मी माझ काम करत होतो. जेव्हा स्मिथ जागेवरून हल्ला तेव्हा माझ्या जीवात जीव आला”, असे सांगितले. तसेच, “कोणालाही स्ट्रेचरवर घेऊन जाताना पाहायला आवडत नाही. त्यामुळं माझी हिम्मत झाली नाही त्याला पाहायची”, असे सांगितले.

वाचा-Ashes : दुसरी कसोटी अनिर्णित, गांगुलीनं इतर देशांना दिला 'हा' सल्ला

स्टेम गार्ड्सचा होणार वापर

ह्जूजच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मानेच्या सुरक्षेसाठी स्टेम गार्ड वापरण्यात आला. मात्र त्याची सक्ती करण्यात न आल्यामुळं अशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथ हेड गार्ड न वापरता मैदानात उतरला. त्यामुळं आता स्टेम गार्डचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे विज्ञान खेळ आणि चिकित्सा प्रमुख अलेक्स कोंटोरिस एक वर्ष याचा वापर करून पाहणार आहे. त्यानंतर या हेल्मेटची सक्ती करण्यात येईल. आयसीसीही याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकतो.

वाचा-अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं तोडला तब्बल 143 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार स्मिथ

स्मिथला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळं तो, तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार की नाही याबाबत साशंकता आहे. गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. स्मिथ वर्ल्ड कपपासून फॉर्ममध्ये आहे. त्यानं पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी केली होती.

वाचा-स्मिथच्या धक्कादायक अपघातानंतर बदलणार क्रिकेटमधला सर्वात मोठा नियम!

SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 03:08 PM IST

ताज्या बातम्या