The Ashes : असा षटकार दररोज मारला जात नाही, पाहा बेन स्टोकचा अफलातून सिक्सर!

The Ashes : असा षटकार दररोज मारला जात नाही, पाहा बेन स्टोकचा अफलातून सिक्सर!

बेन स्टोकनं आपल्या नाबाद 135 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 8 षटाकारांचा वर्षाव केला.

  • Share this:

लीड्स, 26 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टार ऑलराऊंडर बेन स्टोकनं अविश्वसनिय खेळी केली. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला धक्का देत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो बेन स्टोक्स. त्याने नाबाद 135 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

बेन स्टोकनं आपल्या नाबाद 135 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 8 षटाकारांचा वर्षाव केला. यावेळी स्टोक्सनं एक पेक्षा एक जबरदस्त षटकार लगावले. बेन स्टोक्स शॉट खेळताना तंत्राचा वापर न करता ताकदीचा वापर जास्त करतो. मात्र त्याचा एक षटकार पाहून सर्वांचे डोळे दिपतील. तिसऱ्या कसोटी सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगज्जेत्या इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावत इंग्लंडनं ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे.

इंग्लंडनं 359 धावांचा पाठलाग करताना, 286 धावांवर नऊ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्टोक्स 61 धावांवर खेळत होता. त्यानंतर बेननं चक्क 135 धावांची अनपेक्षित खेळी केली. त्याच्या सोबत जॅक लीचनं केवळ 1 धावा काढत 76 धावांची नाबाद खेळी केली. स्टोक्स आता सध्या 28 वर्षांचा आहे, तर तो इंग्लंडचा सर्वात फिट खेळाडूही आहे. त्याचा हा षटकार कायमच सर्वांच्या लक्षात राहिल.

वाचा-इंग्लंडच्या खेळाडूंना चडली विजयाची नशा, भर मैदानातच झाली बिअर पार्टी!

सामन्यानंतर बिअर पीत केली पार्टी

क्रिकेटमध्ये अशा रोमांचक विजयानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष साजरा करतात मात्र इंग्लंडच्या खेळाडूंनी एक भलताच प्रयोग केला. अॅशेस मालिकेतील विजयानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना हेडिंग्ले मैदानात बिअर पीत आपला जल्लोष साजरा केला. इंग्लंडच्या खेळाडूंची ही बिअर पार्टी सुरू असताना दर्शक उपस्थित नव्हते. मात्र सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत. इंग्लंडच्या एक समालोचकानं हे फोटो अपलोड केले होते. दरम्यान चाहत्यांनी यावर खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करताना काळजी घ्यावी असे ट्वीट केले आहेत.

वाचा-इंग्लंडच्या विजयाचं धक्कादायक कारण, चॉकलेट-चिकनमुळे झाला ऑस्ट्रेलियाचा पराभव?

135 वर्षांनंतर इंग्लंडन केली अजब कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र बेन स्टोकनं ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवल्या. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 67 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर चौथ्या डावात त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं विजय मिळवला. याआधी 131 वर्षांपूर्वी 1888 मध्ये 67 पेक्षा कमी धावा केल्यानंतरही विजय मिळवला होता.

वाचा-स्टोक्सनं केली शिफारस, 1 धाव काढणाऱ्या जॅकला आयुष्यभर मिळत राहणार 'गिफ्ट'

चॉकलेट आणि फ्राईड चिकनमुळे इंग्लंडला मिळाला ऐतिहासिक विजय

इंग्लंडनं 359 धावांचा पाठलाग करताना, 286 धावांवर नऊ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्टोक्स 61 धावांवर खेळत होता. त्यानंतर बेननं चक्क 135 धावांची अनपेक्षित खेळी केली. त्याच्या सोबत जॅक लीचनं केवळ 1 धावा काढत 76 धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान सामन्यानंतर स्टोक्सला अशी अविश्वसनीय खेळी खेळण्याआधी रात्री डोक्यात काय विचार होते असे विचारले असता स्टोक्सनं, “रात्री मी माझी पत्नी आणि मुलांसोबत होते. मला रात्री अचानक फ्राईड चिकन आणि चॉकलेट खाण्याची इच्छा झाली आणि सकाळी कॉफी प्यायलो”, असे सांगितले. तसेच, “आम्हाला माहित होते की हा सामना हातातून गेला तर, मालिका हातातून जाणार. जेव्हा दहव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात उतरला तेव्हा आम्हाला 70 धावा करायच्या होत्या. त्यावेळी मी फक्त सामना जिंकायचा आहे एवढाच विचार केला”, असे सांगत आनंद व्यक्त केला.

वाचा-टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 07:16 PM IST

ताज्या बातम्या