सात खेळाडूंनी फलंदाजाला घेरलं, अतरंगी फिल्डिंगचा VIDEO VIRAL

सात खेळाडूंनी फलंदाजाला घेरलं, अतरंगी फिल्डिंगचा VIDEO VIRAL

क्रिकेटमध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. हा मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच.

  • Share this:

लंडन, 27 सप्टेंबर : क्रिकेटमध्ये कधी काय प्रकार घडतील याचा काय अंदाज नाही. एखाद्या खेळाडूला बाद करण्यासाठी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. यात शाब्दिक बाचाबाची, धक्काबुक्की केली जाते. मात्र इंग्लंडमध्ये झालेल्या एका सामन्यात एक भलताच प्रकार पाहायला मिळाला. चक्क फलंदाजांला सात खेळाडूंनी घेरलं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये सोमरसेट आणि एसेक्स यांच्यात झालेल्या सामन्यात हा अजब प्रकार घडला. टॉम अबेल आणि रोलॉफ व्हॅन डेर मर्वे यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर सोमरसेटनं पहिल्या डावात 203 धावा केल्या. या सामन्यात एसेक्सच्या सिमॉननं 105 धावा देत 5 विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अलेस्टर कुकनं 53 धावा केल्या. त्याच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं एसेक्सचा पहिला डाव 141 डावांवर गुंडाळला गेला.

 

View this post on Instagram

 

Ever set a field like this before? 👀

A post shared by Specsavers County Championship (@countychampionship) on

वाचा-अरे देवा! WWEच्या रिंगणात अचानक घुसला राक्षस, VIDEO VIRAL

दरम्यान, या सामन्यात गोलंदाजांपेक्षा समरसेटच्या खेळाडूंनी केलेले क्षेत्ररक्षण जमेची बाजू होती, असे म्हणायला हरकत नाही. फिरकीपटू जॅक लीच आणि व्हॅन डेर मर्वे यांनी फलंदाजाभोवती चक्क सात खेळाडू लावले. त्यामुळं एसेक्स संघाला सामन्यात कमबॅक करता आले नाही.

 

View this post on Instagram

 

A fantastic end to an unforgettable summer of cricket Winter well, everyone! 👋

A post shared by Specsavers County Championship (@countychampionship) on

वाचा-क्रिकेटला मिळाला मलिंगाचा डुप्लिकेट! यॉर्करचा VIDEO पाहून व्हाल हैराण

असे असले तरी हा सामना अनिर्णित राहिला. त्यामुशं एसेक्स संघाला काउंटी चॅम्पियनशिपचे डिव्हिजन वनचे विजेतेपद देण्यात आले. एसेक्सनं 14 सामन्यात 9 विजयांसह 228 गुणांची कमाई करत मालिकेत पहिले स्थान मिळवले होते.

यंदाच्या काउंटी क्रिकेटमध्ये अनेक मजेदार प्रसंग घडले, यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वाचा-रोहितचा विराट अवतार! भरमैदानात गोलंदाजाला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

लाकडाच्या ढिगाराखाली अडकला भलामोठा अजगर, सुटकेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2019 08:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading