ओव्हर असेल 10 चेंडूंची, कोणी होणार नाही LBW; क्रिकेटमध्ये होत आहेत मजेदार बदल!

ओव्हर असेल 10 चेंडूंची, कोणी होणार नाही LBW; क्रिकेटमध्ये होत आहेत मजेदार बदल!

2020 जुलै आणि डिसेंबरमध्ये ‘द 100 लीग’ ही अनोखी स्पर्धा खेळवली जाणार आहे.

  • Share this:

लंडन, 13 ऑगस्ट : क्रिकेटमध्ये नवनवीन फॉरमॅट सुरू होत आहेत. याआधी 50 ओव्हर, कसोटी क्रिकेट आणि 20 ओव्हरच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मात्र आता चक्क 10 ओव्हरचे सामने सुरू होणार आहे. 2020 जुलै आणि डिसेंबरमध्ये ‘द 100 लीग’ ही अनोखी स्पर्धा खेळवली जाणार आहे. ज्याचे नियम वाचून तुम्ही हैरान व्हाल. इंग्लंड अण्ड वेल्स क्रिकेट यांच्यावतीनं या अनोख्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

19 एप्रिल 2018मध्ये इसीबीनं 100 चेंडूंच्या सामन्याची मॅच होणार असल्याची घोषणा केली होती. या फॉरमॅटमध्ये 100 चेंडूचा सामना असणार आहे. यात 15 ओव्हरमध्ये 6 चेंडू तर शेवटच्या ओव्हरमध्ये 10 चेंडू खेळावे लागणार आहेत. तसेच, या स्पर्धेतील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात 10 ओव्हर हे 10-10 चेंडूंचे असतील यात सहा चेंडूंवाली एकही ओव्हर नसेल. याशिवाय या लीगमधला मजेदार नियम म्हणजे, या स्पर्धेत कोणताही फलंदाज एलबीडब्ल्यू आऊट होणार नाही. या स्पर्धेत मॅंचेस्टर ओरिजनल्स, नॉर्दर्न सुपरचार्जर्स, बर्मिंगहॅम फोएनिक्स, ट्रेंट रॉकेट्स, वेल्श फायर, लंडन स्पिरिट, ओव्हल इन्विंसिबल, साऊदर्न ब्रेव या संघाचा समावेश असणार आहे.

वाचा-ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश, ICCनं सांगितली 'ही' डेडलाईन!

गॅरी कर्स्टन असणार कोच

दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीरी गॅरी कर्स्टन पुढच्या वर्षी सुरू होणाऱ्या द हंडरेड लीगमध्ये कार्ड़िफ पुरुष संघाचा प्रशिक्षक होणार आहे. त्यामुळं बऱ्याच काळापासून या संघाच्या प्रशिक्षकाचा शोध संपल आहे. तर, ऑस्ट्रेलिया महिला संघाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक मॅथ्यू मॉटला कार्डिफ संघाच्या महिला संघाचे प्रशिक्षकपद दिले आहे. टीम इंडिया आणि आयपीएल यांना कोचिंग देण्याशिवाय गॅरी यांनी बिग बॅश लीगमध्येही प्रशिक्षक म्हणून काम केले होते.

वाचा-ऋषभ पंतचा विरह सहन होईना! गर्लफ्रेण्डनं खुलेआम शेअर केल्या ‘या’ भावना

ही अनोखी स्पर्धा आणणार क्रिकेटमध्ये मज्जा!

आपल्या नव्या संघासोबत काम करण्याआधी गॅरी यांनी, "मी इंग्लिश अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डासोबत कधीच काम केलेले नाही. ही एक सुवर्ण संधी आहे. मला खात्री आहे की, ही स्पर्धा लोकप्रिय होईल", असे सांगितले. तर, मॅथ्यू मॉट यांनी, "ही स्पर्धा महिला क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण आहे. ही स्पर्धा सफल होईल, या लीगमध्ये 100 चेंडूंचा सामना होईल. एक ओव्हर दहा चेंडूचाही असणार आहे, त्यामुळं ही स्पर्धा खुप वेगळी आहे आणि रोचक आहे.

वाचा-भारताला वर्ल्ड चॅम्पियन करणारे गॅरी कर्स्टन आता होणार 'या' संघाचे कोच!

VIDEO : भाजपच्या नगरसेविकेची गुंडगिरी, पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या