पुणे आर्मीचा रणजित सिंग ठरला ठाणे मॅरेथॉनचा विजेता

२१ किलोमीटरचं अंतर त्याने १ तास १० मिनटात धावून पूर्ण केलं. तर दुसरा क्रमांक नाशिकच्या पिंटू कुमार यादवने आणि अलिबागचा सुजित गमरे याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2017 12:24 PM IST

पुणे आर्मीचा रणजित सिंग ठरला ठाणे मॅरेथॉनचा विजेता

ठाणे, 13 ऑगस्ट: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या २८ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेवर पुणे आर्मीच्या रणजित सिंग ने नाव कोरलं आहे. २१ किलोमीटरचं अंतर त्याने १ तास १० मिनटात धावून पूर्ण केलं. तर दुसरा क्रमांक नाशिकच्या पिंटू कुमार यादवने आणि अलिबागचा सुजित गमरे याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. एकूण १० गटात झालेल्या स्पर्धेकरिता ६ लाखाहून अधिक किमतीची बक्षिसं ठेवण्यात आली होती. खास करून आजच्या स्पर्धेत एकनाथ शिंदे यांनी देखील कँसरग्रस्त धावपटूंसोबत धावून या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.

पालिका मुख्यालयापासून सुरू झालेल्या २१ किलोमीटरच्या या स्पर्धेची सांगता पुन्हा मुख्यालयाच्या समोरच झाली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धेची सांगत झाली. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकाचा सन्मानही करण्यात आला.

 

Loading...

यावेळी २५ ऑगस्ट रोजी चेन्नई येथे होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्येही आपण सहभागी होणार असल्याचं प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रणजित सिंगने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 12:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...