Home /News /sport /

RR vs KKR: पदार्पणतच घेतली विकेट अन् Obed McCoy ने पुष्पा स्टाईल केले सेलिब्रेशन

RR vs KKR: पदार्पणतच घेतली विकेट अन् Obed McCoy ने पुष्पा स्टाईल केले सेलिब्रेशन

Obed McCoy

Obed McCoy

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर (Rajasthan Royals vs KKR) 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. सामन्यादरम्यान राजस्थानला विजायसाठी अखेरच्या ओव्हरमध्ये केवळ 2 विकेटची आवश्यकता होती. याच मोक्याच्या क्षणी राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा ओबेद मॅककॉय संधी साधली अन् विकेट घेतलेल्याचे पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 एप्रिल: आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर (Rajasthan Royals vs KKR) 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. या विजयात राजस्थानच्या बॉलर्सनी चांगलेच मैदान गाजवले. सामन्यादरम्यान राजस्थानला विजायसाठी अखेरच्या ओव्हरमध्ये केवळ 2 विकेटची आवश्यकता होती. याच मोक्याच्या क्षणी राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा ओबेद मॅककॉयने(Obed McCoy) संधी साधली अन् विकेट घेतलेल्याचे पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने (Rajasthan Royals) 5 विकेट्स गमावत 217 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता (Kolkata Knight Riders) संघाला शेवटच्या षटकात 11 धावांची आवश्यकता होती. यावेळी राजस्थानकडून आयपीएल पदार्पण करणारा ओबेद मॅककॉय गोलंदाजी करत होता. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने मोठ्या विश्वासाने मॅककॉयवर ही जबाबदारी सोपवली होती. त्यानेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. कोलकाताकडून या षटकात शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) आणि उमेश यादव (Umesh Yadav) फलंदाजी करत होते. स्ट्राईकला जॅक्सन होता. षटकातील पहिला चेंडू खेळताना जॅक्सनने 2 धावा घेतल्या. मात्र, दुसरा चेंडू मारताना त्याने थेट प्रसिद्ध कृष्णाच्या हातात झेल दिला आणि तो झेलबाद झाला. यानंतर मॅककॉयने पुष्पा सेलिब्रेशन करत विकेटचा आनंद लुटला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजस्थानच्या विजयात जोस बटलर आणि युझवेंद्र चहल यांनीही मोलाचे योगदान दिले. बटलरने फलंदाजी करताना शतक झळकावत संघाला 200 धावसंख्येचा आकडा पार करण्यात मदत केली. दुसरीकडे, चहलने हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 40 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत थेट दुसरे स्थान गाठले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Rajasthan Royals

    पुढील बातम्या