ICCनं कसोटी क्रिकेटमध्ये केला मोठा बदल, अ‍ॅशेस मालिकेपासून लागू होणार नवा नियम

ICCनं कसोटी क्रिकेटमध्ये केला मोठा बदल, अ‍ॅशेस मालिकेपासून लागू होणार नवा नियम

अ‍ॅशेसचा पहिला सामना 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान या स्पर्धेआधी मोठे बदल करण्यात आले आहे.

  • Share this:

लंडन, 23 जुलै : वर्ल्ड कपचा रोमांच संपल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाणारी अ‍ॅशेस स्पर्धेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळं वर्ल्ड कप सेमीफायनलनंतर आता इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात जंगी सामना पाहायला मिळणार आहे. अ‍ॅशेसचा पहिला सामना 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान या स्पर्धेआधी मोठे बदल करण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू वेगळ्या जर्सीमध्ये पाहायला मिळणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या स्पर्धेत खेळाडूंच्या कसोटी क्रिकेटच्या जर्सीवर नाव आणि नंबर लिहण्यात येणार आहे. इंग्लंड क्रिकेटनं एका ट्वीट करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इंग्लंडनं जो रूटच्या 66 नंबरच्या जर्सीचा फोटो अपलोड केला आहे. दरम्यान केवळ इंग्लंडचे खेळाडू अशा जर्सी वापरणार आहेत की ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही हा नियम लागू होणार आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही.

वाचा-BCCIचं अफगाणला मोठं गिफ्ट, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार!

चाहते म्हणतात जुनं तेच सोनं

दरम्यान आयसीसीनं केलेल्या या नव्या बदलाचे काही चाहत्यांनी स्वागत केले आहे. तर, काही चाहत्यांनी जुनी जर्सी चांगली असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान अ‍ॅशेस मालिकेआधी इंग्लंडचा संघ आयर्लंड विरोधात लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे.

आयर्लंड विरोधात इंग्लंडचा संघ- जो रूट (कर्णधार, मोइन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, सैम कर्रन, लुइस ग्रैगरी, जैक लीच, जेसन रॉय, ऑली स्टोन, क्रिस वोक्स.

वाचा- IND vs WI : निवड समितीच्या निर्णयावर नाराज झाला टीम इंडियाचा स्टार खेळाडू

वाचा-कोहलीनंतर आता 'हा' पुणेकर टीम इंडियाचं नवं रन मशिन!

VIDEO : पंतप्रधान मोदींचा हा खास 'मित्र' आहे तरी कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या